AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ipl 2022 : ipl च्या रिटेंन्शनचे नियम काय? रिटेन झालेल्या खेळाडुंना मिळणार इतकी रक्कम

खेळाडुंच्या रिटेन प्रक्रियेसाठी बीसीसीआयकडून 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. कोणती टीम कोणते खेळाडू रिटेन करते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून एमएस धोनी आणि सुरेश रैना यांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत.

Ipl 2022 : ipl च्या रिटेंन्शनचे नियम काय? रिटेन झालेल्या खेळाडुंना मिळणार इतकी रक्कम
IPL 2022 Retention Live Stream
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 4:39 PM
Share

आयपीएल 2022 साठी रेटेन्शन झालेल्या खेळाडुंची यादी आज जाहीर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचे नियम काय असणार आहेत, आणि खेळाडुंना किती पैसे मिळणार? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. यंदा आयपीएलमध्ये जवळपास 10 टीम खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम

यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम उतरणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबादच्या टीममुळे बीसीसीआयला जवळपास 12 हजार कोटींचा फायदा झाले आहे. या दोन नव्या टीम आयपीएलमध्ये उतरल्यानं आयपीएलची सर्व गणितं बदलणार आहेत.

खेळाडुंची रेटेंन्शन प्रक्रिया आज संपणार

खेळाडुंच्या रिटेन प्रक्रियेसाठी बीसीसीआयकडून 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. कोणती टीम कोणते खेळाडू रिटेन करते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून एमएस धोनी आणि सुरेश रैना यांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कोणत्या खेळाडुला किती पैसे मिळणार? 

जगातील इतर क्रिकेट लीगपैकी सर्वात जास्त पैसा भारतातील आयपीएलमध्ये लागतो.  सध्याच्या टीमना प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यात 2 पेक्षा जास्त विदेशी खेळाडू नसावेत अशी अट ठेवण्यात आली आहे. अहमदाबाद आणि लखनऊच्या टीमला खेळाडुंच्या निवडीसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. प्रत्येक टीमला 90 कोटींचं बजेट देण्यात आलं आहे. पहिल्या खेळाडुला 16 कोटी, दुसऱ्या खेळाडुला 12 कोटी तिसऱ्या खेळाडुला 8 कोटी आणि चौथ्या खेळाडुला 6 कोटी रुपये मिळणार आहेत. जर एखाद्या टीमने 3 खेळाडू रिटेन  केले तर, पहिल्या खेळाडुला 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूला 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडुला 7 कोटी रक्कम मिळणार आहे.

Kirit Somaiya |12 नोव्हेंबरच्या दंगलीबाबत ठाकरे सरकाच्या नेत्यांच्या प्रतिक्रीया विसंगत कशा?

Nawab Malik | 2 वर्ष पूर्ण होऊनही सरकारने गाजावाजा केला नाही : नवाब मलिक

Twitter, Google, Microsoft ते Adobe… टॉप टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, सिलिकॉन व्हॅलीतला दबदबा वाढतोय

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.