AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार महिन्यात असे काय घडले की, नताशा आणि हार्दिकने घेतला घटस्फोटाचा निर्णय

हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. दोघांना एक मुलगा आहे. त्यामुळे लोकं हळवी झाली आहेत. आता दोघांमध्ये चार महिन्यात असं काय झालं की, त्यांनी इतक टोकाचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया लोकं देत आहेत.

चार महिन्यात असे काय घडले की, नताशा आणि हार्दिकने घेतला घटस्फोटाचा निर्णय
| Updated on: Jul 20, 2024 | 2:48 PM
Share

हार्दिक पांड्या (Hardik pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (natasha stankovic) यांच्या घटस्फोटाने दोघांच्या चाहत्यांना झटका बसला आहे. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला यावर वेगवेगळ्या बातम्या गॉसिपिंग सुरु आहे. दोघांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने मुलगा अगस्त्य याचे काय होणार या विचाराने चाहते हळवे झाले आहेत. आता लोकांच्या मनात प्रश्न आहे की अवघ्या 4 महिन्यांत असं काय झालं? की त्यांचे तीन लग्नही त्यांचे नाते वाचवू शकले नाही? हार्दिक-नताशाच्या नात्याची चर्चा अशीच सुरू झाली नव्हती. नताशासोबतची हार्दिकची शेवटची पोस्ट चर्चेचे कारण ठरली. हार्दिकने 14 फेब्रुवारी 2024 रोजी एक पोस्ट शेअर केली होती. अर्थातच ती व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होती. या पोस्टमध्ये हार्दिक त्याचा मुलगा आणि नताशासोबत दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि हार्ट इमोजी होता. हार्दिकची ही पोस्ट लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

लोकांना पडला मोठा प्रश्न

क्रिकेटरच्या पोस्टवर एका यूजरने कमेंट केली की वेगळे झाल्यानंतर इथे कोण आहे? आणखी एका यूजरने लिहिले की, क्यूट कपल, ते का वेगळे झाले ते माहित नाही? तिसऱ्या यूजरने लिहिले की, ही बातमी खरी नाही. आणखी एका युजरने लिहिले की, नताशासोबतची शेवटची पोस्ट. एका यूजरने लिहिले की, जेव्हा आम्ही व्हॅलेंटाइनला एकत्र होतो, तेव्हा आता काय झाले?

18 जुलैच्या रात्री नताशा आणि हार्दिक यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी विभक्त झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. ही पोस्ट पाहताच कोणाचाही यावर विश्वास बसला नाही. पण दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या आधीच येत होत्या. यानंतर अखेर नताशा-हार्दिक या दोघांनी अधिकृतपणे ही माहिती दिली.

नताशा तिच्या देशात परतली

नताशा काही दिवसांपूर्वीच विमानतळावर दिसली होती. तिच्यासोबत तिचा मुलगा अगस्त्य देखील होता. नताशा तिच्या देशात परत आल्यानंतर तिने मुलाची एक पोस्ट शेअर केली आहे. आता ती सतत तिथून पोस्ट शेअर करत आहे. पण त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याबाबत चर्चा सुरु आहेत. लोक असेही म्हणतात की नताशा पुढे जात आहे पण हार्दिक अद्याप या वेदनातून बाहेर आलेला नाही.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.