Virat Kohli Captaincy: कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत गांगुलीने मौन सोडलं, म्हणाला…
दरम्यान, विराटने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा यामागे बीसीसीआय किंवा सौरव गांगुलीचा दबाव आहे का? अशी कुजबूज सुरु झाली आहे. त्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल ट्विट करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : विराट कोहलीने (Virat kohli step down as captain) भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा रविवारी केली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय (Bcci) असे चित्र निर्माण झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. सर्वात आधी विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला ते सोडू नको असे सांगितले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी बीसीसीआयने त्याच्याकडील एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद काढून घेतले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचेही पाहायला मिळाले.महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या सात वर्षापासून विराट कोहली कर्णधार होता.
दरम्यान, विराटने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा यामागे बीसीसीआय किंवा सौरव गांगुलीचा दबाव आहे का? अशी कुजबूज सुरु झाली आहे. त्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल ट्विट करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
सौरव गांगुलीने रात्री उशिरा ट्विट केले. त्यात म्हटलं आहे की, “कोहलीला कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आले नव्हते, पण मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. गांगुलीने लिहिले की, ‘विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये यश मिळवले आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून बीसीसीआय त्याचा आदर करते. संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी तो टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असेल. एक शानदार खेळाडू, वेल डन.”
भारतीय क्रिकेट टीममध्ये दुफळी?
काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा कर्णधार टी-20 आणि वनडेचा कर्णधार झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी विरोट कोहली काही सामने खळणार नसल्याचे उधाण आले, त्यानंतर तो खेळणार नाही अशी कोणतीही माहिती मी बीसीसीआयला दिली नाही, असे विरोट कोहलीने पत्रकार परिषद घेत सांगितले, त्यानंतर मोठा संभ्रम निर्माण झाला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला, त्यानंतर विराटला रोहितच्या नेतृत्वात खेळायचे नाही आणि रोहितला विराटच्या नेतृत्वात खेळायचे नाही, अशा चर्चांना उधाण आले. मात्र असे काही नसल्याचे विराटकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. त्यामुळे इंडियन क्रिकेट टीममध्ये चाललंय काय? हे समजू शकलेलं नाही.
विराट कोहलीचे ट्विट काय?
संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे.
मी बीसीसीआयचे आभारा मनातो, की त्यांनी मना संधी दिली. देशाच्या संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीच हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील महत्त्वाच्या सर्वजणांचं योगदानही मोठं आहे. तुम्ही जगण्याला दृष्टी देण्याचं मोलाचं काम केलं आहे. आणि सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, त्यानं भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं सुचवलं. त्याचे मनापासून आभार. असे ट्विट त्याने केले आहे.
इतर बातम्या
ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम
(What Sourav Ganguly Said On Virat Kohli Quitting India Test Captaincy)