Rishabh Pant: ‘खेळाडू मोठा असो वा छोटा, चूक ही चूकच असते’, ऋषभ पंतला पुन्हा सुनावलं
जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्याडावात पंत बेजबाबदार फटका खेळून बाद झाला होता. कसोटीतील मागच्या 13 डावात ऋषभ पंतला फार काही विशेष करुन दाखवता आलेले नाही. त्याने फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे.
केपटाऊन: भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतवर (Rishabh Pant) अजूनही टीका सुरु आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरुन माजी क्रिकेटपटुंनी त्याला लक्ष्य केलं आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सुद्धा पंतला भरपूर सुनावले. तो त्याचा नैसर्गिक खेळ आहे, वैगेर बकवास बंद करा, अशा शब्दात गावस्करांनी आपला संताप व्यक्त केला होता. आता भारताचे माजी क्रिकेटपटू रितिंदर सिंह सोढ़ी यांनी सुद्धा पंतच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. (Whether a Big or Small Player a Mistake is a Mistake Former India Allrounder on Rishabh Pants Batting Approach)
तेव्हा शिक्षा म्हणून बाहेर बसवलं जायचं जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्याडावात पंत बेजबाबदार फटका खेळून बाद झाला होता. कसोटीतील मागच्या 13 डावात ऋषभ पंतला फार काही विशेष करुन दाखवता आलेले नाही. त्याने फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. सहावेळा तो एकआकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. यात जोहान्सबर्गमध्ये शुन्यावर बाद होण्याचा समावेश आहे. पंत त्याच चूका वारंवार करत असल्याकडे सोढीने लक्ष वेधलं. “एकवेळ होती, जेव्हा तुम्ही खराब फटका खेळलात आणि त्यामुळे तुमच्या टीमला फटका बसला, तर तुम्हाला शिक्षा म्हणून पुढच्या सामन्यात बाहेर बसवलं जायचं. आता असं नाहीय. तो तुमचा सुपरस्टार आहे” असं रितिंदर सिंह सोढी म्हणाले.
तर ती मोठी गोष्ट नसेल “चूक मोठ्या खेळाडूने करो किंवा छोट्या, चूक ही चूकच असते. तो त्याच चूका वारंवार करतोय. ऋषभ पंत बरोबर बऱ्याचवेळा या विषयावर बोललं गेलय. तो त्याच चूका वारंवार करतोय. त्यामुळे शिक्षा म्हणून त्याला पुढच्या कसोटीत संघाबाहेर केले तर ती मोठी गोष्ट नसेल” असे सोढी इंडिया न्यूजशी बोलताना म्हणाले.
याआधी कुठला मोठा क्रिकेटर असा फटका खेळला नाहीय का? दुसरे माजी क्रिकेटपटू साबा करीम यांनी ऋषभ पंतचे तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी समर्थन केलं आहे. “डावखुरा फलंदाज संघासाठी फायद्याचा असतो. अनेक मोठे खेळाडू बेजबाबदार फटका खेळताना बाद झाले आहेत. ऋषभने निश्चित तिसऱ्या कसोटीत खेळलं पाहिजे. याआधी कुठला मोठा क्रिकेटर असा फटका खेळला नाहीय का? 20-25 वर्षांपूवी वेगवेगळ्या कालखंडात अशा घटना घडल्या आहेत” असे साबा करीम म्हणाले.
संबंधित बातम्या:
Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीआधी जसप्रीत बुमराह झाला भावूक, दिला खास संदेश IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल U19 World Cup: 11 षटकार, 20 चौकार आणि 278 धावा… वॉर्मअप मॅचमध्ये भारताच्या युवा संघाने दाखवला पराक्रम
(Whether a Big or Small Player a Mistake is a Mistake Former India Allrounder on Rishabh Pants Batting Approach)