निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्वेन ब्राव्होकडून चाहत्यांना खुशखबर, महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा
टी-20 फॉरमॅटमधील सर्वात मोठ्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते दु:खी झाले आहेत.
मुंबई : टी-20 फॉरमॅटमधील सर्वात मोठ्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते दु:खी झाले आहेत. मात्र, शरीराने साथ दिल्यास आणखी काही वर्षे फ्रँचायझी क्रिकेट खेळायचे असल्याचे ब्राव्होने शनिवारी सांगितले. ब्राव्होने निवृत्ती जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याने यापूर्वी निवृत्ती घेतली होती परंतु गतविजेत्या वेस्ट इंडिजला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्यासाठी 2019 मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. (Will continue to play franchise cricket, says Dwayne Bravo after retiring from international cricket)
वेस्ट इंडिजची मोहीम मात्र सुपर 12 टप्प्यातील पाच सामन्यांत केवळ एका विजयासह संपुष्टात आली. ब्राव्होशिवाय अनुभवी फलंदाज ख्रिस गेलच्याही निवृत्तीची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाद झाल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने अभिवादन केले त्यावरून अंदाज लावला जात आहे की, तो निवृत्ती घेत आहे. मात्र त्याने अधिकृत घोषणा केलेली नाही. ब्राव्हो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याच्या निर्णयामुळे महेंद्रसिंग धोनीला दिलासा मिळेल कारण ब्राव्हो हा आयपीएलमधील टीम चेन्नई सुपरकिंग्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे.
फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार
ऑस्ट्रेलियाकडून आठ गडी राखून सामना गमावल्यानंतर ब्राव्हो पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘जोपर्यंत माझे शरीर मला साथ देईल तोपर्यंत मी आणखी काही वर्षे फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन.’ 18 वर्षे वेस्ट इंडिजकडून खेळणारा ब्राव्हो म्हणाला की, ‘माझे ध्येय काही वर्षांपूर्वी निवृत्ती घेण्याचे होते, पण अध्यक्षपद (वेस्ट इंडिज क्रिकेट) आणि नेतृत्व बदलल्यानंतर मी माझा विचार बदलला. मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होतो आणि मला वेस्ट इंडिजला काहीतरी परत द्यायचे होते, म्हणून मी आणखी काही वर्ष क्रिकेट खेळलो. मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत होतो.
ब्राव्हो म्हणाला, ‘मला वाटते की खेळाला (आंतरराष्ट्रीय क्रिकेट) अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे. यामुळे पुढच्या पिढीला आणि युवा खेळाडूंना संघात सामील होण्याची संधी मिळेल. त्याच्या कारकिर्दीतील खास क्षणांबद्दल ब्राव्होला विचारले असता त्याने सांगितले की, लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण आहे.
ब्राव्होची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ब्राव्हो 2012 आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. तो आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यात त्याने 1245 धावा केल्या आहेत आणि 78 विकेट्स घेतल्या आहेत. 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्राव्होने आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी एकूण 294 सामने खेळले आहेत.
मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडीजचे भविष्य उज्ज्वल
ब्राव्हो म्हणाला की, “मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजचे भविष्य खूप उज्वल आहे असे मला वाटते. आम्हाला फक्त युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याची गरज आहे. क्रिकेटमध्ये छबी तयार करणं कठीण आहे. मी माझ्या 70, 80 आणि 90 च्या दशकातील महान खेळाडूंचा आभारी आहे, त्यांना खेळताना पाहून मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.
इतर बातम्या
करार संपल्यानंतर टीम इंडियाचे कोच काय करणार ? रवी शास्त्रींकडे ‘या’ खास ऑफर
तेरी जित मेरी जित, तेरी हार मेरी हार… NZ vs AFG सामन्यात भारतीय फॅन्सचा अफगाणिस्तानला पाठिंबा
(Will continue to play franchise cricket, says Dwayne Bravo after retiring from international cricket)