WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून साऊदम्पटन (Southampton) येथे सुरुवात होणार आहे.

WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये
विराट आणि केन
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 6:32 PM

साऊदम्पटन : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking) अव्वल स्थानावर असणाऱ्य़ा न्यूझीलंड आणि भारत (New Zealand vs India) यांच्यात इंग्लंडमध्ये 18 जूनपासून सामन्याला सुरुवात होणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगत वाट पाहत असलेल्या या सामन्यातील विजयी संघाला कोट्यावधींच्या बक्षिसासह आकर्षक आणि मानाची ट्रॉफी मिळणार आहे. (Winner Team Of ICC World Test Championship Final Will Get Trophy And Prize Money of millions Dollar)

हा सामना इतर कसोटी सामन्यांप्रमाणेच पाच दिवसांचा असेल. पण हा एक महत्त्वाचा सामना असल्याने अतिरिक्त दोन दिवसांचा कालावधी या सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या कारणामुळे अथवा पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास सामना अतिरिक्त दिवस खेळवला जाईल. त्यानंतरही योग्य निर्णय न झाल्यास दोन्ही संघाना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.

विजेत्या संघाला 11.71 कोटी

स्पर्धेची आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) सोमवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील विजेत्याला देण्यात येणाऱ्या बक्षिसाची माहिती दिली. ईएसपीएन-क्रिकइंफोला आईसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यॉफ एलरडाइस यांनी सांगितले की, ”विजेता संघाला 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 11.71 कोटी भारतीय रुपये दिले जाणार आहेत. तर उपविजेता संघाला 8 लाख डॉलर म्हणजे 5.85 कोटी रुपये दिले जातील.”

चषक म्हणून टेस्ट चॅम्पियनशिपची ‘गदा’

सामन्यात विजेत्या संघाला कोट्यवधी रुपयांसह मानाचा चषकही दिला जाणार आहे. हा चषक म्हणजे टेस्ट चॅम्पियनशिपची एक गदा असून या चषकाचा आकार गदेप्रमाणे आहे. ही गदा दरवर्षी टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी राहणाऱ्या संघाला दिली जाते.

icc trophy

विजेत्या संघाला मिळणारी गदा

हे ही वाचा :

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!

(Winner Team Of ICC World Test Championship Final Will Get Trophy And Prize Money of millions Dollar)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.