World Cup 2023 | वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय हवाईदलाच्या टीमचा थरार, सूर्यकिरण दाखवणार…

IND vs AUS World Cup 2023 Final | विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. या फायनल मॅचसाठी जय्यत तयारी सुरु आहे. हा सामना पाहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

World Cup 2023 | वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय हवाईदलाच्या टीमचा थरार, सूर्यकिरण दाखवणार...
Narendra Modi StadiumImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 11:12 AM

अहमदाबाद | 17 नोव्हेंबर 2023 : विश्वचषक स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यापूर्वी भारताने न्यूझीलंडचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती. यामुळे आता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. या सामन्याचा थरार वाढवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज झाले आहे. भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण विमाने चित्तथरारक प्रात्यक्षिक सामना सुरु होण्यापूर्वी दाखवणार आहे. हवाई दलाची सूर्यकिरण टीम एरोबेटिक प्रदर्शन सामना सुरु होण्यापूर्वी करणार आहे.

सामन्याच्या रोमांचपूर्वी हवाई दलाकडून थरार

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात ICC वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियन टीम आठव्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली. तसेच टीम इंडिया चौथ्यांदा अंतिम फेरीमध्ये दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पाचवेळा तर भारताने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. यामुळे दोन्ही संघातील अंतिम सामन्यात चांगलाच रोमांच असणार आहे. हा अंतिम सामना संस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआयकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्याचवेळी भारतीय हवाई दलही सज्ज झाले. भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण टीम सामना सुरु होण्यापूर्वी एरोबेटिक्स प्रदर्शन करणार आहे.

हे सुद्धा वाचा

हवाईदलाकडून घोषणा

भारतीय हवाई दलाने सूर्यकिरण टिम चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. हवाईदलाच्या गुजरातमधील जनसंपर्क अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. सूर्यकिरण टीम नऊ जेट विमानाद्वारे हवाई कसरती करणार आहे. यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींचा आनंद क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. यंदा विश्वकरंडक सुरु होण्यापूर्वी कोणताही उद्धघाटन कार्यक्रम झाला नव्हता. परंतु आता अंतिम सामन्यापूर्वी हवाईदलाचा कार्यक्रम होणार आहे. सामन्यापूर्वी पॉप सिंगर दुआ लीपा आपल्या आवाजाची जादू दाखवणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी गायक अरजीत सिंह, सुनिधी चौहर, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंह यांचा गाण्यांचा कार्यक्रम झाला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.