WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

WTC 2021 india vs New Zealand indian team batting order : अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल, जी न्यूझीलंडचा मात देऊ शकते? याच्यावर आपण एक नजर टाकुयात...

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?
WTC 2021 india vs New Zealand
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 1:52 PM

मुंबई : भारतीय संघाने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. यानंतर 2007 साली टी ट्वेन्टी विश्वषचकात धोनीच्या नेतृत्वात भारतानं पाकिस्तानला अंतिम सामन्यात धूळ चारुन पहिला टी ट्वेन्टी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. 2011 साली भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्‍वचषकाला गवसणी घातली आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला रिटायरमेंटचं गिफ्ट दिलं. धोनीच्या नेतृत्वात 2013 साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आता वेळ आली आहे साऊथॅम्प्टनच्या मैदानावर न्यूझीलंडला आस्मान दाखवण्याची… भारत केवळ एक पाऊल विश्वविजेतेपदापासून दूर आहे… जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल, जी न्यूझीलंडचा मात देऊ शकते? याच्यावर आपण एक नजर टाकुयात… (WTC 2021 india vs New Zealand indian team batting order performance Southampton Ground England Tour)

रोहित शर्मा आणि शुभमन गिल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय डावाची सुरुवात अनुभवी रोहित शर्मा आणि नवोदित खेळाडू शुभमन गिल करतील. रोहितने आतापर्यंत भारताला अनेक मॅचेस हातोहात जिंकून दिल्यात. मात्र इंग्लंडमध्ये रोहितची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नाहीय.  कारणही तसंच आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी खेळण्याची त्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. वास्तविक त्याच्याजवळ भरपूर अनुभव आहे. त्यामुळे मोठा स्कोअर करण्यापासून त्याला कुणीही रोखणार नाही, फक्त त्याने पहिल्यांदा सावध खेळायला हवं. हीच बाब शुभमन गिलच्या बाबतीतही आहे. त्याच्याकडे चांगले फटके आहेत, ज्याच्यामधून तो चांगला स्कोअर करु शकतो. पण बॉल जुना होईपर्यंत या दोन सलामीवीरांनी थोडंस जपून खेळायला हवं.

चेतेश्वर पुजारा

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाची वॉल म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीकडे अंतिम सामन्यात सगळ्यांचं लक्ष असेल. भारताला ही मॅच जर जिंकायची असेल तर पुजाराची बॅट बोलणं, भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे. मागील दौऱ्यात याच मैदानावर पुजाराच्या बॅटमधून एक खणखणीत शतक निघालंय. त्यामुळे त्याला मैदानाचा आहे. अंतिम सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

विराट कोहली

जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहलीचं नाव सर्वांत अग्रस्थानी आहे. त्याने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातलीय. मात्र गेल्या दीड वर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाहीय. आता इंग्लंड दौऱ्यात अंतिम सामन्यात विराटच्या बॅटमधून खणखणीत शतकाची अपेक्षा करोडो क्रिकेट रसिकांना असणार आहे.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेला बाऊन्स बॉल खेळताना जराशी अडचण होते. मात्र कठीण परिस्थितीतच त्याचा खेळ उभरताना दिसून येतो. इंग्लंडच्या खेळपट्ट्यावर जरी बॉलला बाऊन्स असला तरीही रहाणेची कामगिरी उत्तर राहिली आहे. इंग्लंड भूमीत रहाणेच्या बॅटमधून तीन अर्धशतक निघाले आहेत.

रिषभ पंत

गेल्या काही काळापासून रिषभ पंतमध्ये कमालीचा बदल झाला आहे. पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध, नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि त्यापाठोपाठ झालेल्या आयपीएलमध्ये रिषभने आपल्या बॅटची जादू दाखवली आहे. अंतिम सामन्यात अशाच झंझावाती पण निर्णायक खेळीची रिषभकडून अपेक्षा असेल.

रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन

भारतीय संघ अश्विन आणि जाडेजाच्या समावेशाने संतुलित झाला आहे. दोघांकडेही बॅटिंगची क्षमता आहे. अनेक वेळा त्यांनी ती क्षमता दाखवून दिलीय. अश्विन तर निर्णायक क्षणी आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवण्यात माहिर आहे. जाडेजादेखील प्रतिप्रर्धी संघाला हैरान करु शकतो.

अशा प्रकारे भारताजवळ निव्वळ फलंदाजी करणारे 5 फलंदाज आणि अश्विन-जाडेजाच्या रुपाने अष्टपैलू कामगिरी करणारे 2 फलंदाज, असे एकूण 7 जण न्यूझीलंच्या तुफानी माऱ्याला तोंड देण्यास सज्ज आहेत.

(WTC 2021 india vs New Zealand indian team batting order performance Southampton Ground England Tour)

हे ही वाचा :

WTC Final India vs New Zealand live streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड, सामना कुठे आणि कधी? या ठिकाणी पाहा Live

WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!

WTC Final 2021 : टॉस जिंकल्यावर भारताने बॅटिंग करावी की फिल्डिंग?, गांगुलीचा विराटला महत्त्वाचा सल्ला

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.