Ind vs NZ : एकही बॉल न फेकता पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, आजही पावसाचा अंदाज, सहाव्या दिवशीही खेळ होणार
WTC Final 2021 India vs New Zealand : पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. टॉसही झाला नाही. एकही बॉल फेकला गेला नाही. आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे.
मुंबई : पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (WTC Final 2021) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या उभय संघांमध्ये साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळवला जाणार आहे. वास्तविक शुक्रवारी या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. टॉसही झाला नाही. एकही बॉल फेकला गेला नाही. आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. (WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain First Day Southampton)
18 जून रोजी पाऊस थांबलाच नाही. एक दिवस अगोदर म्हणजे 17 जून रोजीही साऊथॅम्प्टनमध्ये सतत पाऊस पडत होता. त्यामुळे मैदानावर पाणी साचलं होतं. त्याचमुळे एजिस बाऊलचे मैदान पाण्याने भरले होते. काल पाऊस थांबल्यानंतर सामना सुरु करण्यासाठी मैदानावरचं पाणी काढण्याचं काम सुरु होतं. परंतु पुन्हा पावसाने खोडा घातला. आता रिझर्व्ह डे राखीव ठेवल्याच्या अनुषंगाने सहाव्या दिवशी खेळ होणार आहे.
Day 1 has been called at the Hampshire Bowl. A brief period without rain after lunch but it’s back now and the Match Officials have called things. 98 overs now scheduled for tomorrow with a 10-30am local start. #WTC21 pic.twitter.com/XRzie08aAP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 18, 2021
पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
शुक्रवारी सकाळपासूनच साऊथॅम्पटनमध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे नाणेफेकदेखील झाली नाही. मैदानावरील पंचांनी वेळोवेळी खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य आहे का, याची पाहणी केली. परंतु खेळपट्टी आणि मैदाना दोन्हीही आजचा खेळ खेळण्यासाठी योग्य नसल्याने आजचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Due to persistent rain, play has been abandoned on day one of the #WTC21 Final in Southampton ⛈️#INDvNZ pic.twitter.com/Vzi8hdUBz8
— ICC (@ICC) June 18, 2021
शनिवारी आणि रविवारीही पावसाचा अंदाज
येणाऱ्या चार दिवसांत दररोज 98 षटके खेळली जातील अशी माहिती कळतीय. यानंतर उर्वरित षटके राखीव दिवसाच्या दिवशी पूर्ण होतील. तथापि, साउथॅम्प्टनमध्ये पुढचे चारही दिवस पाऊस सुरु राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढच्या तीन ते तार दिवसांत सतत पाऊस पडेल. अशा परिस्थितीत सामन्याच्या निकालाबाबत शंका आहे.
(WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain First Day Southampton)
हे ही वाचा :
WTC Final 2021 | पहिल्या दिवशी पावसाचा खोडा, खेळ रद्द, उद्या 98 षटकं खेळवणार
WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?
WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!