WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. इंग्लडच्या साऊदम्पटन येथे हा सामना खेळवला जाईल.

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?
साऊदम्पटनचे मैदान
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 5:07 PM

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होईल. कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष लागून आहे. साऊदम्पटनच्या (Southampton) मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याची संपूर्ण तयारी झाली आहे. मैदानाची खेळपट्टी बनवण्याची जबाबदारी असणारे मुख्य क्यूरेटर साइमन ली (Simon Lee) यांच्याकडे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सामन्यासाठी चेंडू बाऊन्स होण्यासाठी मदत होईल अशी खेळपट्टी तयार करु इच्छितात. ज्यामुळे फिरकीपटूंना देखील सामन्यात फायदा होईल. (WTC Final India vs New Zealand Playing Southampton Ground Pitch Report)

ली यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या माहितीत सांगितलं की, ”या कसोटीसाठी खेळपट्टी तयार करण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला आयसीसीच्या सर्व नियमांच पालन करुन खेळपट्टी तयार करावी लागणार आहे. जेणेकरुन दोन्ही संघाना समान फायदा होईल अशी खेळपट्टी तयार होईल. चेंडू बाऊन्स होणारी खेळपट्टी तयार करायची असून इंग्लंडमधील वातावरणात असे करणे अवघड आहे त्यामुळे अधिक मेहनत घ्यावी लागत आहे”

फिरकीपटूंना मिळेल मदत

फिरकीपटूंची संख्या भारतीय संघात अधिक आहे. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा असे अव्वल दर्जाचे स्पिनर भारताकडे आहेत. ली याबद्दल म्हणाले ”सामन्यात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. इंग्लंडच्या सध्याच्या वातावरणामुळे तेथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायद्याची ठरेल ज्यामुळे विकेट्स घेताना त्यांना फायदा होईल.”

कसे असेल वातावरण?

सध्या दोन्ही संघ इंग्लंमध्येच आहेत. न्यूझीलंडने तर इंग्लंड संघाविरोधात दोन सराव सामने देखील खेळले. पण यातील एकही सामना साऊदम्पटनच्या मैदानात खेळला गेला नाही. याआधी भारताने या मैदानावर खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारत पराभूत झाला आहे. दरम्यान फायनलच्या वेळेस 20 डिग्री सेल्शियस इतके तापमान असण्याचा अंदाज असून हलक्या पावसाच्या सरी होतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा :

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!

ENG vs NZ: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड, न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभवामुळे ओढावली नामुष्की

(WTC Final India vs New Zealand Playing Southampton Ground Pitch Report)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.