WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!

गावस्करांनी जे सांगितलं त्यापेक्षा उलटंच घडलंय. किवी संघाने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला 2-0 ने नमवलं आहे. किवींच्या गोटाचतच आनंदाचं वातावरण आहे तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीपच्या अंतिम सामन्याअगोदर भारतासमोरच्या चिंता वाढल्या आहेत. | WTC Final Sunil gavaskar

WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!
WTC Final
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 7:31 AM

मुंबई : ते म्हणतात ना आत्मविश्वास असावा पण अति-आत्मविश्वास नसावा, तेच खरं. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) भारताचे एक महान क्रिकेटपटू…पण, इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील मालिका सुरु होण्यापूर्वी त्यांनी केलेलं एक विधान आता चुकीचं सिद्ध झालं आहे. डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी (WTC Final) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताला फायद्याची ठरु शकते, असं ते म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा होता की, या मालिकेत न्यूझीलंडचा पराभव झाला तर त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण होईल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला फायदा होईल. पण, गावस्कर यांनी जे सांगितलं त्यापेक्षा उलटंच घडलंय. किवी संघाने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला 2-0 ने नमवलं आहे. किवींच्या गोटाचतच आनंदाचं वातावरण आहे तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीपच्या अंतिम सामन्याअगोदर भारतासमोरच्या चिंता वाढल्या आहेत. (WTC Final India vs New Zealand Sunil gavaskar Comment India Tour Of England )

किवींनी साहेबांना लोळवलं, मालिका खिशात

न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव करत मालिका आपल्या खिशात घातली. यापूर्वी, दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना लॉर्ड्स येथे खेळला गेला, जो ड्रॉ झाला होता.

इंग्लंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिका विजयानंतर न्यूझीलंडच्या संघामध्ये अपार उत्साह संचारला आहे. यासह, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याआधी त्यांची तयारीच केवळ चांगली झाली नाही तर विजयासह मनोबल आणि उत्साह देखील उंचावला आहे.

किवींनी गावस्करांना तोंडावर पाडलं

इंग्लंडला पराभूत करुन न्यूझीलंडने सुनील गावस्करांना तोंडावर पाडलंय. यासह भारताचीही डोकेदुखी वाढवलीय. इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडने आपली सगळी शक्ती पणाला लावत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याअगोदर दिमाखदार खेळ दाखवला आहे. या मालिकेतील किवींचा हुकमी एक्का ठरला तो डेवॉन कॉनवे… जो भारताच्या विश्वविजयाचा एक अडसर ठरणार आहे.

गोलंदाजीही उत्तम

याशिवाय न्यूझीलंडची गोलंदाजीची लय देखील अप्रतिम राहिली. त्यांचे गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत. सौदीने एकमेव कसोटीत 7 गडी बाद केले, बोल्टने एका कसोटीत 6 विकेट्स घेतल्या आणि वॅग्नरने 2 कसोटी सामन्यात 7 गडी बाद केले.

भारताच्या चिंता वाढल्या!

न्यूझीलंडची टीम तुफान फॉर्मात आहे. तसंच इंग्लंडविरुद्धच्या विजयाने मनोबल आणि आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी मैदानावर उतरण्याआधी भारतावर जरा दडपण असेल.

(WTC Final India vs New Zealand Sunil gavaskar Comment India Tour Of England)

हे ही वाचा :

French Open 2021: नोवाक जोकोविच पुन्हा चॅम्पियन, 19 वा ग्रँड स्लॅम नावावर, 52 वर्षानंतर असा कारनामा

ENG vs NZ: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड, न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभवामुळे ओढावली नामुष्की

WTC Final पूर्वी न्यूझीलंडचं शक्तिप्रदर्शन, इंग्लंडवर 8 विकेट्सने मात करत मालिकाविजय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.