ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI कडून महिला क्रिकेट संघात तीन नवे चेहरे, कोण आहेत या रणरागिणी?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. यावेळी संघात तीन नव्या महिला क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली आहे.

| Updated on: Aug 25, 2021 | 6:09 PM
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एक कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे. यावेळी संघात तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मेघना सिंग हीचाही समावेश आहे. मेघना याआधी भारत 'अ' संघासाठीही निवडली गेली होती.

1 / 5
मागील वर्षी दुबईमध्ये आयोजित टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मेघनाने अप्रतिम खेळ दाखवला होता. त्यानंतर मार्चमध्ये राजकोट येथे  सीनियर वुमन चॅलेंजरमध्ये रेल्वे संघातून मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली गोलंदाजीसह चांगली फलंदाजी केली होती.

2 / 5
यानंतर संघात स्थान मिळालेली दुसरी खेळाडू आहे हिमाचलची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुर. रेणुका गावात लहाणपणीपासून क्रिकेट खेळत होती. ज्यानंतर तिच्या काकांनी तिला एचपीसीए या अकादमीत क्रिकेट शिकण्यासाठी पाठवलं. ज्यानंतर ती हिमाचलत्या अंडर 16 आणि अंडर 19 संघातून खेळू लागली.

3 / 5
रेणुकाने 2019 मध्येही महिला टुर्नामेंटमध्ये 23 शानदार विकेट्स घेतले. या कामगिरीमुळेच तिला  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळवले गेले आहे

4 / 5
संघात जागा मिळालेली तिसरी खेळाडू आहे यस्तिका भाटिया. तिला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडण्यात आलं आहे. तिला याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघात निवडण्यात आलं होतं. पण ती त्यावेळी मैदानावर पदार्पण करु शकली नव्हती. आता यंदातरी तिला खेळायला मिळेल का? हे पाहावे लागेल.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.