कधी आझाद मैदानाच्या तंबूत राहणारा स्टार क्रिकेटर यशस्वी जायसवाल याने मुंबईत घेतले कोट्यवधीचे घर

yashasvi jaiswal | यशस्वी याने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी 22 वर्षांचा अनुभव असलेला इंग्लंडचा जेम्स अँडरसन याची गोलंदाजी चांगलीच धुतली होती. यशस्वी याने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. रविवारी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी त्याने दुहेरी शतक केले.

कधी आझाद मैदानाच्या तंबूत राहणारा स्टार क्रिकेटर यशस्वी जायसवाल याने मुंबईत घेतले कोट्यवधीचे घर
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 9:55 AM

मुंबई, दि. 22 फेब्रुवारी 2024 | भारतीय क्रिकेट संघाची युवा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग दोन द्विशतके ठोकून क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. यशस्वी याने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी 22 वर्षांचा अनुभव असलेला इंग्लंडचा जेम्स अँडरसन याची गोलंदाजी चांगलीच धुतली होती. यशस्वी याने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. यशस्वी जैस्वाल याने मुंबईत घर घेतले आहे. या घराची किंमत सुमारे 5.5 कोटी रुपये आहे.

मुंबईतील वांद्रेमध्ये घेतला फ्लॅट

यशस्वी जैस्वाल याने मुंबईत राहण्यासाठी वांद्रे भागाची निवड केली. एक्स बीकेसीमध्ये 5.5 कोटी रुपयांना एक फ्लॅट त्याने विकत घेतला आहे. लियासेस फोरास या संस्थेने यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार वांद्रे (पूर्व) इमारतीच्या विंग 3 मधील 1,100 स्क्वेअर फूट फ्लॅटची नोंदणी 7 जानेवारी रोजी झाली होती. या फ्लॅटचा दर 48,499 रुपये प्रति चौरस फूट आहे. यशस्वी अनेक दिवसांपासून हा फ्लॅट खरेदी करणार अशी चर्चा होती. त्याच्या कसोटी पदार्पणाच्या वेळी त्याने हा फ्लॅट घेतला आहे.

आझाद मैदानात तंबूत काढले दिवस

यशस्वी याचे कुटुंब उत्तर प्रदेशातून मुंबईत आले होता. त्यांचा एक काळ असा होता ते मुंबईतील आझाद मैदानातील तंबूत राहात होते. यशस्वी यांच्या क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरी मुंबईत आला. त्याला प्रशिक्षक मिळाला. त्यानंतर यशस्वी याने मागे वळून पाहिले नाही. भारतीय संघात त्याने मजल मारली. ते उत्तर प्रदेशातील बडोही जिल्ह्यातील रहिवासी आहे.

रविवारी केले दुहेरी शतक

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी त्याने दुहेरी शतक केले. एका डावात 12 षटकार मारणारा तो पहिला भारतीय तर जगातील दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी यशस्वी याने 2020 मध्ये अंडर 19 स्पर्धेत आपला दबदबा दाखवला होता. तो राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याला 2.4 कोटी रुपयात राजस्थान रॉयल्सने घेतले आहे.

हे ही वाचा

IPL 2024 | अखेर ठरले, आयपीएल भारतात की दुबईत निर्णय झाला, कधीपासून सुरु होणार सामने

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.