हे घडायलाही 38 वर्षे लागली, पण घडलं तेव्हा महिला ब्रिगेडनं इतिहास घडवला
सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समान कामगिरी करत आहेत. यामध्ये खेळ हा विभागही मागे नसला तरी एका प्रसिद्ध क्रिकेट संघाच्या महिला क्रिकेट संघाला त्यांचा पहिला क्रिकेट सामना खेळण्यासाठी पुरुषानंतरही 38 वर्षे लागली.
मुंबई: सध्या असं कोणतंच क्षेत्र नाही, ज्यामध्ये स्त्रियांनी आपल्या कतृत्त्वाचा झेंडा फडकावलेला नाही. प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या स्त्रियांनी क्रिडाक्षेत्रातही नावलौकीक मिळवला आहे. पण अशा परिस्थितीतही जगातील प्रसिद्ध क्रिकेट संघ असणाऱ्या झिम्बाब्वे क्रिकेटच्या महिला खेळाडूंना मात्र त्यांचा पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी 2021 ची वाट पाहावी लागली. झिम्बाब्वे पुरुष संघ 1983 मध्ये पहिला क्रिकेट सामना खेळला असताना तब्बल 38 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
नुकताच झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाचा आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघासोबत (ZIMW vs IREW) सामना पार पडला. विशेष म्हणजे या सलामीच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या महिलांनी आयर्लंडच्या महिलांवर 4 विकेट्स आणि 37 चेंडू राखून दमदार विजय मिळवत इतिहास रचला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी आयर्लंडने केली. त्यानंतर आयर्लंडच्या 254 धावांचे आव्हान झिम्बाब्वेच्या महिलांनी 43.5 षटकांत 6 विकेट्स गमावत पूर्ण केले.
कर्णधार मुसोंडाचं दमदार शतक
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाकडून कर्णधार डेलेने हिने सर्वाधिक 86 धावा केल्या. ज्याच्या जोरावर संघाने 253 धावांपर्यंत मजल मारली. ज्यानंतर झिम्बाब्वेच्या महिला 254 धावा करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरल्या. यावेळी झिम्बाब्वे संघाची कर्णधार मेरी-एनी मुसोंडा हिने दमदार खेळी केली. तिने 114 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने उत्कृष्ट शतक ठोकत नाबाद 103 धावा केल्या. ज्याच्या जोरावर झिम्बाब्वेच्या महिला संघाने आयर्लंडवर 4 विकेट्स आणि 37 चेंडू राखून विजय मिळवला.
अफगाणिस्तानच्या महिलाही वंचित
आयसीसीने (ICC) पूर्ण सदस्यता दिलेल्या संघाचा विचार करता 12 पैकी 11 महिला संघानी टेस्ट आणि वनडे अशा दोन्ही प्रकारात खेळ खेळला आहे. केवळ अफगाणिस्तान महिला संघाला अद्यापपर्यंत खेळता आलेले नाही. तर झिम्बाब्वेच्या महिलांचा विचार करता त्यांनी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये टी20 प्रकारात पदार्पण केलं. त्याचं त्याठिकाणी प्रदर्शनही चांगलं असून 24 पैकी 22 टी20 सामने झिम्बाब्वेच्या महिलांनी जिंकले आहेत.
#1stODI: HUNDRED! @Mutsa13 scored his maiden ?, off 110 with 9 boundaries! Congrats skipper! #HistoryMaker #ZIMWvIREW | #WeMeanCricket | #BowlOutCovid19 pic.twitter.com/svDkwEehSO
— Zimbabwe Women’s Cricket (@zimbabwe_women) October 5, 2021
हे ही वाचा
T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती
IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान
(zimbabwe womens cricket team playing there first match in cricket history zimw vs irew match live)