AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cristiano Ronaldo | रोनाल्डोकडे जगातील सर्वात महागडी कार, किंमत तब्बल…

पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने जगातिल सर्वात महागडी कार खरेदी केली आहे (Cristiano Ronaldo buys world most expensive Bugatti La Voiture Noire car).

Cristiano Ronaldo | रोनाल्डोकडे जगातील सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
| Updated on: Aug 04, 2020 | 12:53 AM
Share

लिस्टबन : पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने जगातिल सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. या कारचं नाव Bugatti La Voiture Noire असं आहे. पोर्तुगाल संघाला 36 व्या चॅम्पिअनशिपमध्ये यश मिळाल्यानंतर रोनाल्डोने ही कार खरेदी केली होती. या कारला खरेदी करण्यासाठी त्याला 75 कोटी रुपये मोजावे लागले आहेत (Cristiano Ronaldo buys world most expensive Bugatti La Voiture Noire car).

विशेष म्हणजे रोनाल्डोने जी कार खरदे केली आहे ती कार तयार करणाऱ्या कंपनीने त्या कारसारख्या फक्त दहाच कार तयार केल्या आहेत. रोनाल्डोने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कारसोबत फोटो शेअर करत जगभरातील चाहत्यांना याबाबत माहिती दिली (Cristiano Ronaldo buys world most expensive Bugatti La Voiture Noire car).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

View this post on Instagram

You choose the view ??

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

रोनाल्डोकडे सध्या लॅम्बॉर्गिनी, बेंटली, मर्सिडीज, रोल्स रॉईस, फरारी अशा कंपन्यांच्या कार आहेत. त्यानंतर आता त्याने बुगाटी कार खरेदी केली आहे. मात्र, ही कार त्याला कंपनीकडून पुढच्या वर्षी म्हणजे 2021 साली मिळणार आहे. या कार खरेदीनंतर रोनाल्डोजवळ असणाऱ्या सर्व कारची एकूण किंमत जवळपास 264 कोटी आहे.

Bugatti La Voiture Noire ही कार जगातील सर्वात महागडी आणि सर्वात वेगवान कार आहे. या कारला फ्रान्सची सुपरकार बनवणारी कंपनी बुगाटीने (Bugatti) बनवलं आहे. 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ही कार प्रदर्शित करण्यात आली. या कारची ऑन रोड किंमत 133 कोटी आहे.

Bugatti La Voiture Noire ही एक सुपर स्पोर्ट्स कार आहे. ही कार 2.4 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. या कारचा सर्वाधिक वेग 420 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीच्या मते शहरात या कारला 100 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 35.2 लीटर पेट्रोलची गरज असेल.

La Voiture Noire हा एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ ‘द ब्लॅक कार’ असा होतो. या कारचं डिझाईन 1930 सालच्या 57SC Atlantic या कारवरुन बनवण्यात आलं आहे. या कारचं डिझाईन बुगातीचे संस्थापक एटोर बुगाती (Ettore Bugatti) यांचा मुलगा जीन बुगातीने (Jean Bugatti) केलं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.