Ind vs Aus: एक मिनिटाच्या VIDEO मध्ये रवींद्र जडेजाचा धुमाकूळ, 4 चेंडूत ठोकल्या 18 धावा
भारतीय संघाने शेवटच्या 5 षटकांमध्ये 76 धावा केल्या. रवींद्र जडेजाने सीन एबॉटच्या (Sean Abbott) 48 व्या षटकात सलग तीन चौकार आणि एक षटकार ठाकले.
नवी दिल्ली (Ind vs Aus) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना (India Vs Australia 3rd ODI) कॅनबेरामध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 302 धावा केल्या. अखेरीस हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) चौकार आणि षटकार लगावले आणि सामन्याची रंगत वाढवली. भारतीय संघाने शेवटच्या 5 षटकांमध्ये 76 धावा केल्या. रवींद्र जडेजाने सीन एबॉटच्या (Sean Abbott) 48 व्या षटकात सलग तीन चौकार आणि एक षटकार ठाकले. त्याच्या या धमाकेदार शॉट्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. (ind vs aus 3rd odi viral video of ravindra jadeja smashes 18 run in 4 ball)
भारतीय संघाने 47 षटकांमध्ये 5 गडी गमावून 260 धावा केल्या होत्या. अखेरच्या तीन षटकांत भारताला मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. जेणेकरून ऑस्ट्रेलियासमोर मोठ्या धावांचं टार्गेट करता येईल. एरॉन फिंचने सीन एबॉटला ओव्हर दिलं. यात पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याने एक रन काढला तर रवींद्र जडेजाने सलग तीन चौकार ठोकले आणि त्यानंतर आणखी एक षटकार ठोकला.
Finch go went gone!
Jadeja did wonder with the bat & Now with the bowl. Great catch again by Dhawan. Let’s get another wicket.??#AUSvIND pic.twitter.com/NOUmGVw6Oa
— UrMiL07™ (@urmilpatel21) December 2, 2020
खरंतर, सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने फार काही खास सुरुवात नाही केली. सुरुवातीला शिखर धवनने विकेट गमावल्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल काही वेळच मैदानावर टिकले. त्यानंतर गिल बाद झाला. यावेळी विराट कोहली क्रीजवर कायम राहिला खरा पण दुसर्या बाजूला विकेट्स पडत गेल्या.
Jadeja is simply the best all-rounder on the team. Sadly Hardik Pandya missed well deserved Century, but both played well in death overs. ??#AUSvIND pic.twitter.com/2srDcQPzLT
— UrMiL07™ (@urmilpatel21) December 2, 2020
या रंगतदार सामन्यात 150 धावांवर भारताचे 5 विकेट पडले. यानंतर अखेर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने सामना खिशात घातला असं म्हणायला हरकत नाही. यामुळेच भारतीय संघाने धावसंख्या 302 पर्यंत खेचली. या सामन्यात हार्दिक पांड्याने 92 आणि जडेजाने 66 धावा केल्या.
इतर बातम्या –
India vs Australia 2020 | सलग 2 पराभव, तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता
Ind vs Aus 2020 | ऑस्ट्रेलियन टीमची माझ्याविरोधात रणनिती, माझ्यासाठी आनंदाची बाब : श्रेयस अय्यरhttps://t.co/hwNYPZL6yn#indvsaus2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
(ind vs aus 3rd odi viral video of ravindra jadeja smashes 18 run in 4 ball)