IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 10:38 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात मोठ्या ब्रेकनंतर आता भारतीय क्रिकेट टीम पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या तीनही मालिकांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. (IND vs AUS kl rahul became a vice captain of team india)

यावेळी विशेष बाब म्हणजे लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा केएल राहुल याला भारतीय एकदिवसीय आणि टी -20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे.

केएल राहुलला आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं आहे. कर्नाटकचा हा खेळाडू आता भारतीय वनडे आणि टी -20 संघाचा उपकर्णधार बनला आहे. त्यामुळे केएल राहुलच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भारतीय संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार आहे. केएल राहुल हा किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आहे. एक शतक आणि 500 हून अधिक धावा ठोकणारा केअल हा एकमेव खेळाडू आहे.

एकाच गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला मिळवा 19 हजार, आयुष्यभर होईल कमाई!

दिवसांपूर्वीच या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र संघाची घोषणा करण्यात आली नव्हती. विराट कोहली टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती या सारख्या युवा खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान दिले आहे. (IND vs AUS kl rahul became a vice captain of team india)

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. या एकदिवसीय 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

IPL 2020, KKR vs KXIP Live : पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 150 धावांचे आव्हान

एकदिवसीय (वनडे) मालिका पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती

टी-20 मालिका पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

(IND vs AUS kl rahul became a vice captain of team india)

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी (टेस्ट) मालिका पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 डिसेंबर – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 डिसेंबर – ब्रिस्बेन

(IND vs AUS kl rahul became a vice captain of team india)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.