India Vs Pakistan:एशिया हॉकी कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच ड्रॉ, शेवटच्या 70 सेकंदात पाकिस्तान टीमने केला गोल, भारताकडून कार्ती सेल्वमचा एकमेव गोल

पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत, ही मॅच भारताच्या हातात जाऊ दिली नाही. टीम इंडियाकडून एकमात्र गोल कार्ती सेल्वम याने नोंदवला.

India Vs Pakistan:एशिया हॉकी कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच ड्रॉ, शेवटच्या 70 सेकंदात पाकिस्तान टीमने केला गोल, भारताकडून कार्ती सेल्वमचा एकमेव गोल
India VS Pakistan Asia hockey cupImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 7:51 PM

एशिया कप हॉकी (Asia Cup Hockey tournament) टुर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या (India Vs Pakistan)मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थरार रंगला. शेवटच्या 70 सेकंदात पाकिस्तानने (Pakistan goal)केलेल्या गोलमुळे ही मॅच 1-1 अशी बरोबरीने संपली. पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत, ही मॅच भारताच्या हातात जाऊ दिली नाही. टीम इंडियाकडून एकमात्र गोल कार्ती सेल्वम याने नोंदवला. पहिला हाफमध्ये भारतीय टीमने दोन पेनल्टी कॉर्नरची संधी गमावली. मात्र तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत कार्तीने 9 व्या मिनिटांत गोल करत भारताला 1-0 अशी बढत मिळवून दिली होती. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला 24 मे रोजी जपान आणि 26 मे रोजी इंडोनेशियाशी होणार आहे.

यापूर्वी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने दिली होती पाकिस्तानला मात

यापूर्वी 21 डिसेंबर 2021 रोजी खेळवण्यात आलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-3 ने पराभव केला होता. बीरेंद्र लाकडा याच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्सशिपच्या या वर्षातील स्पर्धेची सुरुवात विजयाने करु इच्छित होती. मात्र असे होऊ शकले नाही. शेवटच्या 70 सेकंदांनी भारतीय टीमचा घात केला. सध्या भारतीय हॉकी टीमच ही टूर्नामेंट जिंकेल यासाठी फेव्हरेट मानण्यात येत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांची टूर्नामेंट जिंकण्यात बरोबरी

ही टुर्नामेंट आत्तापर्यंत जिंकण्यात भारत आणि पाकिस्तान यांची बरोबरी आहे. दोन्ही टीमच्या नावावर तीनतीन विजयांची नोंद आहे. भारताने 2003,2007 आणि 2017 साली ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. तर 1982, 1985, 1994, 2013 साली फायनलमध्ये पराभव स्वीकारला आहे. आजची मॅच ही भारत आणि पाकिस्तानमधील १७८ वी मॅच होती.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.