World Cup 2023 | ‘कौन बनेगा चैंपियन’, तीन महिन्यांपूर्वी भविष्यवक्ता महर्षी दत्त राजन यांनी केली भविष्यवाणी
IND vs AUS Final : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अहमदाबादमध्ये रंगणार आहे. एकदिवशीय सामन्याचा विजेता कोण असणार? हे आज स्पष्ट होणार आहे. भविष्यवक्ता महर्षी दत्त राजन यांची वर्ल्डकपसंदर्भात तीन महिन्यांपूर्वी भविष्यवाणी केली आहे.
अहमदाबाद, दि. 19 नोव्हेंबर | वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमींना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्व जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हा सामना भारताने जिंकल्यास टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन बनणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघालाही सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. या सामन्यात कोण जिंकणार? हे आजच स्पष्ट होणार आहे. परंतु भविष्यवक्ता महर्षी दत्त राजन यांनी या सामन्यासंदर्भात तीन महिन्यांपूर्वीच भविष्यवाणी केली आहे. त्यांच्यानुसार भारत वर्ल्डकप चॅम्पियन बनणार आहे.
काय म्हणाले भविष्यवक्ता महर्षी दत्त राजन
वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 संदर्भात भविष्यवक्ता महर्षी दत्त राजन महाराज यांनी तीन महिन्यांपूर्वीच भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली वाढदिवसाच्या दिवशी शतक करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात अंतिम सामना होणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली होती. तसेच भारत अंतिम सामन्यात विजय मिळवून तिसऱ्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन बनणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आचार्य विद्याकांत पांडेय म्हणतात भारत जिंकणार
भविष्यवक्ता महर्षी दत्त राजन महाराज यांच्याप्रमाणे प्रयागराज येथील ज्योतीष संस्थानचे संचालक आचार्य विद्याकांत पांडेय यांनीही भारताचा विजय होणार असल्याचे म्हटले आहे. ग्रहांची परिस्थिती भारताला अनुकूल आहे. शुक्र हा ग्रह क्रिकेटमध्ये फलंदाजांची बाजू सांभाळतो तर गोलंदाजांची बाजू मंगळ घेतो. गुरु हा ग्रह योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे. सूर्य विजेता बनवण्यासाठी सहायक आहे. हे सर्व ग्रह भारताच्या बाजूने असल्याचे पांडेय यांनी म्हटले आहे.
1983 मध्ये मंगळ अन् शुक्रची युती
भारताने 1983 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी मंगळ आणि सूर्यची युती होती. गुरु मंगळाच्या घरात बसला होता. 2011 मध्येही गुरु, सूर्य आणि मंगळची युती होती. हे ग्रह भारताच्या विजयासाठी सहायक ठरले होते. आता 2023 मध्ये क्रिकेट सूर्य आणि मंगळची युती आहे. ही युती वृश्चिक राशीत असल्यामुळे गोलंदाजी चांगली असणार आहे. शुक्र पंचम भावात असून त्यामुळे फलंदाजी चांगली होईल.