WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?
WTC अंतिम सामन्यात भारतीय संघाजवळ एक खास संधी आहे ती म्हणजे न्यूझीलंडविरुद्धचा वचपा काढण्याची आणि 17 वर्षांपूर्वीचा तो लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची! (India vs New Zealand ICC World test Championship Final 2021 )
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. आयसीसी कसोटी रॅंकिगमध्ये (ICC Test Ranking) अव्वल स्थानावर असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघानी कंबर कसली आहे. या अंतिम सामन्यात भारतीय संघाजवळ एक खास संधी आहे ती म्हणजे न्यूझीलंडविरुद्धचा वचपा काढण्याची आणि 17 वर्षांपूर्वीचा तो लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची! (India vs New Zealand ICC World test Championship Final 2021 southampton team india Virat kohli)
ICC स्पर्धेमध्ये भारताने न्यूझीलंडला शेवटी कधी हरवलं?
2003 सालच्या विश्व कपच्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला आयसीसी स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने किवी संघाचा सात गडी राखून पराभव केला. त्या सामन्यात वेगवान गोलंदाज झहीर खानने चार आणि फिरकीपटू हरभजन सिंगने दोन गडी बाद केले. त्या विजयानंतर आतापर्यंत म्हणजेच 17 वर्षानंतरही आयसीसीच्या एकाही स्पर्धेत भारत न्यूझीलंडला पराभूत करु शकला नाही.
ICC स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारताला कधी कधी हरवलं?
आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा वरचढ राहिलाय. आतापर्यंतच्या जवळपास झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारताला इंगा दाखवलाय. आपण काही उदाहरणे पाहूयात…
2007 आणि 2016 टी ट्वेन्टी सामन्यात किवींनी भारताला आस्मान दाखवलं होतं!
2007 च्या टी -20 वर्ल्ड कपच्या लीग सामन्यात न्यूझीलंडने भारताला 10 धावांनी पराभूत केलं होतं. यानंतर, 2016 च्या टी -20 विश्वचषकातील सुपर 10 सामन्यात किवींनी भारताला 47 धावांनी पराभूत केलं होतं.
एकदिवसीय विश्वचषकातही भारताने लोटांगण घातलं होतं…!
त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने 2019 च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारताला 18 धावांनी पराभूत केले. विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा तो पराभव अतिशय जिव्हारी लागला होता. विश्वविजयापासून एक पाऊल दूर असताना न्यूझीलंडने भारतीय संघाला थेट घरचा रस्ता दाखवला होता.
कसोटीतही किवी वरचढ
दोन वर्षांनंतर भारतीय संघ WTC चा भाग असलेल्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडला गेला. त्या मालिकेत पहिल्या कसोटीत भारताला वेलिंग्टनमध्ये 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला तर दुसऱ्या कसोटीत क्राइस्टचर्च येथे सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
(India vs New Zealand ICC World test Championship Final 2021 southampton team india Virat kohli)
हे ही वाचा :
‘त्या’ कसोटी मालिकेचा ऐतिहासिक सन्मान, आयसीसीकडून ‘The Ultimate Test Series’ म्हणून निवड!
WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
मांजरेकर म्हणाले, ‘अश्विन दिग्गज नाहीच’, फिल्मी डायलॉगने आश्विनकडून मजेशीर प्रत्युत्तर