न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, ‘भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण…’

भारताची बोलिंग जगात सर्वोत्तम आहे. सध्या भारतीय गोलंदाज भलतेच फॉर्मात आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांची तारीफ करायलाच हवी, असं केन म्हणाला. | India vs New Zealand kane Williamson

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, 'भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण...'
केन विल्यमसन आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 7:10 AM

मुंबई : टीम इंडियाचे (Team India) सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये (India Tour of England) पोहोचले आहेत. 2 जून रोजी मध्यरात्री भारतीय संघांच्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण घेतलं. 3 जून रोजी संघ लंडनमध्ये पोहोचला. तिथून साऊथहॅम्प्टन… सध्या सगळे खेळाडू क्वारंटाईन पिरियड संपवून न्यूझीलंडला अंतिम सामन्यात धूळ चारण्याची रणनिती आखण्यात व्यस्त आहेत. लवकरच सराव सत्र सुरु होईल. एकंदरितच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याची जशी उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तशी ती खेळाडूंना देखील आहे. अशातच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्याने भारतीय गोलंदाजांची तारीफ करताना सध्या भारतीय गोलंदाज जगात एक नंबर आहेत, असं म्हटलं आहे. (India vs New Zealand kane Williamson On World Test Championship Final 2021)

भारतीय बोलर जगात सर्वोत्तम

भारताची बोलिंग जगात सर्वोत्तम आहे. सध्या भारतीय गोलंदाज भलतेच फॉर्मात आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांची तारीफ करायलाच हवी. दुसरीकडे अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी विराट कोहलीसोबत मैदानावर जाण्याचा खास अनुभव असेल, असं केन म्हणाला.

कसोटी रँकिकमध्ये भारत एक नंबर

भारताकडे उत्तम आणि जागतिक किर्तीचे खेळाडू आहेत. परिस्थिती सोबत नसताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत जाऊन हरवलं, ही तारीफ करण्यासारखी गोष्ट आहे. भारताकडे वेगवान आणि फिरकी याचा अनोखा मिलाफ आहे. प्रतिस्पर्धी संघाला जशास तशी टक्कर देण्यास भारतीय संघ मजबूत आहे. सध्या कसोटी रँकिकमध्ये भारत एक नंबरवर आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत अंतिम सामन्यात दोन हात करायला मजा येईल, असंही केन म्हणाला.

विराट कोहलीबाबत बोलताना केन काय म्हणाला?

विराट कोहलीबाबत बोलताना केन म्हणाला, अंडर 19 पासून विराट आणि मी एकमेकांना खेळताना पाहतोय. तेव्हापासून आम्ही चांगले मित्र आहोत. मैदानाच्या आतमध्ये आम्ही दोघे कट्टर प्रतिस्पर्धी असतो पण मैदानाबाहेर विराट माझा खूप चांगला मित्र आहे, असं केन म्हणाला.

सामना टाय झाल्यास किंवा अनिर्णित झाल्यास विजेता कोण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळला जाईल. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघ संयुक्तरित्या विजेते ठरतील. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे. सामन्यादरम्यान विविध कारणांमुळे व्यत्यय येतो. त्यामुळे काही वेळ खेळ होत नाही. कधी पावसामुळे तसेच विविध कारणांमुळे काही वेळ सामना थांबवावा लागतो. साधारणपणे एक कसोटी खेळवण्यासाठी 30 तासांचा खेळ अपेक्षित असतो. तर हाच वेळ दिवसाकाठी 6 तास इतका असतो. या 6 तासांमध्ये चहापान, लंच आणि ड्रींक्स ब्रेकचा समावेश नसतो.

(India vs New Zealand kane Williamson On World Test Championship Final 2021)

हे ही वाचा :

भारताचा श्रीलंका दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा?

IPL 2021 Schedule : आयपीएलच्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला फायनल!

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....