या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!
ज्या अंपायर्सची नियुक्ती WTC अंतिम सामन्यासाठी केली गेली आहे, त्या अंपायर्सनी याअगोदरच्या भारताच्या सामन्यांवेळी जेव्हा जेव्हा अंपायरिंग केली तेव्हा तेव्हा भारतीय संघ हरला आहे. (India vs New Zealand WTC Final 2021 Richard Kettleborough Elected third umpire)
मुंबई : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC Final 2021) मह्त्वपूर्ण सामना न्यूझीलंडचा संघाबरोबर (India vs New Zealand) खेळायचा आहे आणि त्यानंतर साहेबांशी 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारताने इंग्लंड दौऱ्यासाठी जोरदार तयारी केलीय. WTC च्या अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. जशी या सामन्यांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे तशी खेळाडूंना देखील आहे. अशातच आयसीसीने या अंतिम सामन्यासाठी अंपायर्सची घोषणा केलीय. परंतु या घोषणेने भारताच्या मनात आता धडकी भरलीय. त्याचं कारण म्हणजे भारताच्या बाबतीत असलेला कमनशिबीपणा… ज्या अंपायर्सची नियुक्ती WTC अंतिम सामन्यासाठी केली गेली आहे, त्या अंपायर्सनी याअगोदरच्या भारताच्या सामन्यांवेळी जेव्हा जेव्हा अंपायरिंग केली तेव्हा तेव्हा भारतीय संघ हरला आहे. (India vs New Zealand WTC Final 2021 Richard Kettleborough Elected third umpire)
आयसीसीकडून अंपायर्सची घोषणा
इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गफ हे 18 ते 23 जून दरम्यान साऊथहॅम्प्टन येथे होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी मैदानातील पंच म्हणून काम पाहतील असतील. या प्रतिष्ठित सामन्यात इंग्लंडचे माजी सलामीवीर ख्रिस ब्रॉड मॅच रेफरीची भूमिका बजावतील. आयसीसी एलिट पॅनेलचे सदस्य रिचर्ड केटलब्रॉ हे टीव्ही पंच असतील तर अमिरातीच्या आयसीसी आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलचे अॅलेक्स वर्फ चौथे पंच म्हणून काम पाहतील, असं आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अंपायर अनलकी…!
रिचर्ड केटलब्रॉ हे पंच टीम इंडियासाठी खूपच अनलकी आहेत. विशेषत: आयसीसी ट्रॉफीच्या बाद फेरीतील सामन्यांमध्ये केटलबरो यांनी अंपायरिंग केली की भारताला पराभवाचा धक्का सहनच करावा लागतो. भारत खेळल्या गेलेल्या जवळपास सर्व आयसीसी बाद फेरीतील सामन्यांत रिचर्ड केटलबरो यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडलीय. आणि निराशाजनक बाब म्हणजे भारताला त्या सगळ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. वाईट गोष्ट म्हणजे या सामन्यात तिसरे पंच म्हणून केटलब्रॉ काम पाहणार आहेत.
केटलब्रॉ यांनी अंपायरिंग केली की समजायचं भारताचा पराभव निश्चित… तसं ते पाहा!
2014 च्या टी -२० विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताचा पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2015 साली विश्वचषक उपांत्य फेरीत पराभव आणि 2016 टी -20 विश्वचषक उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजकडून भारताचा पराभव… इतकंच नव्हे तर केटलब्रॉ यांनी अंपायरिंग केलेल्या 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. तसंच 2019 च्या वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. त्यावेळीही केटलब्रॉ हेच अंपायर होते.
काहीच दिवसांत रणसंग्रामाला सुरुवात!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. आयसीसी कसोटी रॅंकिगमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या भारत आणि दिग्गज संघ न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघानी कंबर कसली आहे.
(India vs New Zealand WTC Final 2021 Richard Kettleborough Elected third umpire)
हे ही वाचा :
‘त्या’ कसोटी मालिकेचा ऐतिहासिक सन्मान, आयसीसीकडून ‘The Ultimate Test Series’ म्हणून निवड!
WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी