Khel Ratna Award: खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार!

Major Dhyan Chand Khel Ratna Award : नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्याची घोषणा केली. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं.

Khel Ratna Award: खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार!
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 1:14 PM

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं (Khel Ratna Award) नाव बदलल्याची घोषणा केली. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.

मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीतील योगदान

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये 13 गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे 1936 मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी 39 गोल केले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये 1928 अमस्टर्डम, 1932 लॉस एंजेलिस आणि 1936 बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

भारतरत्न देण्याची मागणी

भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला देण्यात आलेला आहे.

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची अतुलनीय कामगिरी

सध्या जपानमध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं अतुलनीय कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक मिळवलं आहे. तर महिला संघाचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं आहे.

इतर बातम्या:

Tokyo Olympic 2021 Live : पैलवान बजरंग पुनिया सुवर्णपदकापासून दोन विजय दूर, महिला हॉकी संघाचं पदक हुकलं

JEE Main 2021 Result: जेईई मेन परीक्षेचा निकाल लवकरच जारी होणार, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

Khel Ratna Award Narendra Modi said will be known as Major Dhyanchand Khel Ratna Award replacing name of Rajiv Gandhi

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.