U-20 World Athletics : भारताच्या शैली सिंहला लांब उडीत रौप्य, छोट्याशा फरकाने सुवर्णपदकाची हुलकावणी
भारताची महिला लांब उडी खेळाडू शैली सिंहने (Shaili Singh) रविवारी अंडर - 20 जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (U-20 World Athletics Championship) अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावले आहे.
नैरोबी : भारताची महिला लांब उडी खेळाडू शैली सिंहने (Shaili Singh) रविवारी अंडर – 20 जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (U-20 World Athletics Championship) अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावले आहे. या दरम्यान तिची सर्वोत्तम उडी 6.59 मीटर इतकी होती. पहिल्या प्रयत्नात शैलीने 6.34 मीटर लांब उडी मारली. दुसऱ्या प्रयत्नातही तिने तितक्याच अंतरावर उडी मारली. तिसऱ्या प्रयत्नात तिने सुधारणा केली आणि 6.59 मीटर लांब उडी मारली. यासह, ती पहिल्या स्थानावर आली होती, परंतु माजा अक्साग हिने 6.60 मीटर लांब उडी मारून आघाडी घेतली. शेवटच्या प्रयत्नात शैली सिंहने 6.36 मीटर लांब उडी मारली आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या चॅम्पियनशिपच्या सध्याच्या मोसमात भारताचे हे तिसरे पदक आहे तर एकूण सातवे पदक आहे. (Long Pumper Shaili Singh Wins Silver Medal with 6.59m jump in under 20 world athletics championship)
यापूर्वी शैली सिंहने पात्रता फेरीत चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. शैलीने पात्रता फेरीमध्ये 6.40 मीटर लांब उडी मारली आणि तिन्हे दोन्ही गटात पहिले स्थान मिळवले. शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी झालेल्या पात्रता फेरीत शैलीची ग्रुप बी मध्ये तिसरी आणि अंतिम उडी सर्वोत्तम होती. तिने त्यात 6.40 मीटर लांब उडी मारली आणि फायनलसाठी ती पात्र ठरली. क्वालिफिकेशनसाठी 6.35 मीटर लांब उडी मारणे आवश्यक होते. तिने पहिल्या प्रयत्नात 6.34 मीटर उडी मारली होती, तर दुसऱ्या उडीत 5.98 मीटर अंतर कापले होते. शेवटच्या प्रयत्नात, शैलीने आवश्यक अंतर सुरक्षित करून पहिले स्थान मिळवले.
छोट्याशा फरकाने सुवर्णपदक स्वीडनकडे
दुसरी उडी मारल्यानंतर शैली पहिल्या स्थानावर होती, मात्र स्वीडनच्या अक्सागने तिच्यापेक्षा एक सेंटीमीटर लांब उडी मारून तिला दुसऱ्या स्थानावर ढकलले आणि सुवर्णपदक जिंकले. युक्रेनच्या मारिया होरिलोव्हाने 6.50 मीटर लांब उडीसह कांस्यपदक पटकावले.
Third medal for #India at the #WorldAthleticsU20
LONG JUMPER SHAILI SINGH WINS A SILVER MEDAL with a jump of 6.59m
European Champion Maja Askag of Sweden takes home Gold with a leap of 6.60m, a centimetre better!
Super proud of you #ShailiSingh, well done Champ! pic.twitter.com/hkAsQoiPTH
— Athletics Federation of India (@afiindia) August 22, 2021
इतर बातम्या
(Long Pumper Shaili Singh Wins Silver Medal with 6.59m jump in under 20 world athletics championship)