कराटेमध्ये पदक मिळविणाऱ्या विमला मुंडावर दारू विकण्याची वेळ

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत रजत पदक मिळवून देणाऱ्या झारखंड येथील विमला मुंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी देशी दारू विकण्याची वेळ आली आहे.(National Karate Champion selling liquor in Jharkhand)

कराटेमध्ये पदक मिळविणाऱ्या विमला मुंडावर दारू विकण्याची वेळ
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 8:27 PM

झारखंड : राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत रजत पदक मिळवून देणाऱ्या झारखंड येथील विमला मुंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी देशी दारू विकण्याची वेळ आली आहे. मुलांना एखाद्या खेळामध्ये पदक मिळतं किंवा विजय प्राप्त होतो. अशावेळी सगळ्यात जास्त आनंद नातेवाईकांना, कुटुंबियांना आजूबाजूच्या होतो. कारण उद्या त्यांची मुलंही यशस्वी मुलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अशीच प्रगती करतील असा विश्वास अनेकांना असतो. मात्र, कराटे या क्रीडा प्रकारात एक नव्हेतर अनेक पदक प्राप्त केलेल्या विमलाचा पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (National Karate Champion selling liquor in Jharkhand)

झारखंडची रहिवासी असलेली विमला मुंडाने कराटेमध्ये पदक मिळवून संपूर्ण झारखंड राज्याचे नाव मोठं केलं होतं. पदक मिळवल्यानंतर अनेकांनी शुभेच्छाचा आणि आश्वासनाचा वर्षाव तिच्यावर केला होता. पण प्रत्यक्षात शून्य मदत मिळाली होती. आता कुटुंबाचं आणि आपले पोट भरण्यासाठी विमला देशी दारू विकत आहे. आजही विमलाला सरकारी नोकरीची प्रतिक्षा आहे.

पोट भरण्यासाठी विमलाने मुलांना कराट्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली होती. मात्र कोरोना आणि लॅाकडाऊनमध्ये तिचे कराटे क्लास देखील बंद पडले. जवळ काहीच पैसे शिल्लक नसल्याने तांदळापासून तयार करण्यात येणारी दारू विकण्याची वेळ विमलावर आली आहे. विमलाने कॅामर्समध्ये पदवीही प्राप्त केली आहे. आता सध्या ती झारखंड रांची येथील कांके ब्लॅाक येथे तिच्या आजोबा सोबत राहते. विमला मुंडाची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल आल्यानंतर झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक ट्विट करून रांची जिल्हाधिकारी, झारखंडचे क्रीडा सचिव यांच्याशी बोलून बहिण विमलाला मदत करण्यात येणार आहे., असे ट्विट केले आहे.

संबंधित बातम्या : 

बरे झालेल्या कोरोना रुग्णांना अनेक महिन्यांपर्यंत आजाराच्या लक्षणांचा त्रास : ऑक्सफर्ड

(National Karate Champion selling liquor in Jharkhand)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.