Neeraj Chopra ला हवीये ‘अशी’ जोडीदार; गोल्डन बॉय कधी अडकणार विवाहबंधनात?

Neeraj Chopra | नीरज चोप्रा कधी चढणार बोहल्यावर? गोल्डन बॉयने जोडीदाराबद्दल व्यक्त केली इच्छा... सध्या सर्वत्र गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याची चर्चा

Neeraj Chopra ला हवीये 'अशी' जोडीदार; गोल्डन बॉय कधी अडकणार विवाहबंधनात?
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 9:41 AM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : सध्या सर्वत्र गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये पाकिस्तानच्या अशरफ नदीम याचा खुर्दा उडवला. नीरज गोल्डन मेडल जिंकेल, असा विश्वास साऱ्या देशाला होता. नीरजने भारतीयांच्या विश्वास खरा ठरवला आणि पुन्हा एकदा त्याने स्वत:ला गोल्डन बॉय असं का म्हणतात हे सिद्ध करुन दाखवलं. दमदार कामगिरी करत भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला आहे. सध्या सर्वत्र नीरज चोप्रा याची चर्चा सुरु आहे…

नीरज चोप्रा याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. म्हणून नीरज चोप्रा याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नीरज चोप्रा याची गर्लफ्रेंड कोण आहे. नीरज चोप्रा याला जोडीदार म्हणून कशी मुलगी हवी आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

नीरज चोप्रा याने देखील एक शोमध्ये जोडीदार आणि लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘माझं संपूर्ण लक्ष सध्या फक्त आणि फक्त माझ्या खेळाकडे आणि करियरकडे आहे. येणारे काही वर्ष माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत..’ महिला चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल देखील नीरज चोप्रा याने वक्तव्य केलं होतं.

‘मी प्रचंड आनंदी आहे.. मला सर्वच स्तरातून प्रेम मिळत आहे.’ पुढे शोच्या होस्टने नीरज याला ‘तुझ्यावर लग्नासाठी दबाव आहे का?’ असा प्रश्न देखील विचारला… यावर नीरज म्हणाला, ‘बिलकूल नाही… माझं पूर्ण लक्ष सध्या माझ्या खेळाकडे आहे. यासर्व गोष्टी आयुष्यभर चालू राहतील.’ असं देखील गोल्डन बॉय म्हणाला…

दरम्यान, काही वर्षांपूर्वी नीरज चोप्रा याच्या नावाची चर्चा कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्यासोबत जोडण्यात आलं होतं. २०१८ साली विनेश आणि नीरज दोघे एक समाना पाहण्यासाठी एकत्र पोहोचले होते. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नीरज आणि विनेश यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला…

पण काही दिवसांनंतर विनेश हिने सोशल मीडियावर होणारा पती सोमवीर राठी यांच्यासोबत फोटो पोस्ट करत आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. होणाऱ्या पतीसोबत फोटो पोस्ट करत विनेश हिने नीरज याच्यासोबत रंगणाऱ्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सध्या सर्वत्र नीरज चोप्रा याची चर्चा रंगली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.