BWF World Championships 2021: कोर्टवर राज्य करत सिंधूचा दिमाखात उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

आजच्या सामन्यात सिंधूने चोचुवँगला कुठेही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आपल्या खेळाने पूर्णपणे तिला निष्प्रभावी करुन टाकले.

BWF World Championships 2021: कोर्टवर राज्य करत सिंधूचा दिमाखात उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 4:10 PM

नवी दिल्ली: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची (PV sindhu) दमदार कामगिरी सुरु आहे. गुरुवारी स्पेनच्या कॅरोलिना मरीन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगवर (pornpawee Chochuwong) शानदार विजय मिळवला. स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूने चोचुवँगवर २१-१४, २१-१८ अशी सरळ सेटमध्ये मात केली.

सिंधूने संपूर्ण कोर्टवर वर्चस्व गाजवताना प्रतिस्पर्धी चोचुवँगवर ४८ मिनिटात विजय मिळवला. या विजयासह सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने या विजयासह पराभवाची मालिका खंडीत केली. या आधी झालेल्या दोन सामन्यात चोचुवँगने तिला पराभूत केले होते. ऑल इंग्लंड ओपन आणि वर्ल्ड टूर फायनलमध्ये सिंधूला पोर्नपावी चोचुवँगकडून पराभव पत्करावा लागला होता.

आजच्या सामन्यात सिंधूने चोचुवँगला कुठेही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आपल्या खेळाने पूर्णपणे तिला निष्प्रभावी करुन टाकले. उद्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना वर्ल्ड नंबर १ ताई यिंग बरोबर होणार आहे. तैवानच्या ताई यिंग विरुद्धचा सिंधूचा रेकॉर्ड फार चांगला नाहीय. ताईने गुरुवारी झालेल्या सामन्यात पिछाडीवरुन भरारी घेत विजय मिळवला. तिने स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमोरचा २१-१०, १९-२१, २१-११ असा पराभव केला.

संबंधित बातम्या: ‘विराट आधी देशाचा विचार करं’, बोर्डाशी पंगा घेणाऱ्या कॅप्टनला मोठ्या क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला Ashes 2021: हवेत झेपावून बटलरची सुपरमॅन कॅच, हा VIDEO नक्की पाहा IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...