Argentina vs Brazil, Copa America Final : फुटबॉलच्या महामुकाबल्यात मेस्सी, नेयमार आमने-सामने, कोपा अमेरिकेची फायनल कधी आणि कुठे पाहाल?

कोपा अमेरिका चषक 2021 मध्ये सेमीफायनलच्या सामन्यात अर्जेंटीनाने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये मात देत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. तर ब्राझीलने पेरुला नमवत अंतिम सामना गाठला आहे.

Argentina vs Brazil, Copa America Final : फुटबॉलच्या महामुकाबल्यात मेस्सी, नेयमार आमने-सामने, कोपा अमेरिकेची फायनल कधी आणि कुठे पाहाल?
कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सी, नेयमार आमने-सामने
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 6:08 PM

रिओ : एकीकडे युरो चषक (Euro Cup) आणि दुसरीकडे कोपा अमेरिका चषक (Copa America) अशा फुटबॉल जगतातील सर्वांत मानाच्या स्पर्धांमधील दोन स्पर्धा सुरु आहेत. युरोच्या फायनलमध्ये इटली आणि इंग्लंड (Italy vs England) आमने-सामने असतील. पण भारतीय वेळेनुसार आधी खेळवला जाणारा कोपा अमेरिका चषकाच्या फायनलकडे अधिक भारतीयांसह फुटबॉल जगताचे लक्ष लागून आहे. कारण या सामन्यात जागतिक फुटबॉलमधील सर्वांत प्रसिद्ध आणि अप्रतिम खेळ करणारे खेळाडू लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि नेयमार (Neymar) आमने-सामने असतील. अमेरिकन देशात सुरु असलेल्या कोपो चषकात अर्जेंटीना आणि ब्राझील हे देश फायनलमध्ये गेले असल्याने या रंगतदार सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Copa America Final Will Played in Argentina vs Brazil Messi vs Neymar Clash in Ground on 11 July)

कोपा अमेरिका स्पर्धेचा इतिहास पाहता ब्राझील संघाचा पगडा अर्जेंटीनावर भारी राहिला आहे. 2019 च्या सेमीफायनलमध्ये दोन्ही संघ आमने सामने असताना ब्राझीलने अर्जेंटीनावर 2-0 ने विजय मिळवला होता. त्यावेळी ब्राझील संघाचा स्टार खेळाडू नेयमार दुखापतीमुळे सामना खेळू शकला नव्हता. पण यंदा नेयमार फिट असल्याने मेस्सी विरुद्ध नेयमार ध्वंद्व पाहायला मिळणार आहे.

आतापर्यंत ब्राझील-अर्जेंटीना

ब्राझील आणि अर्जेंटीना आतापर्यंत तब्बल 111 वेळा फुटबॉलच्या मैदानावर एकमेंकाशी भिडले आहेत. ज्यात अर्जेंटीनाने 46 सामने जिंकले आहेत.  तर ब्राझीलने 40 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच 25 सामने ड्रॉ देखील झाले आहेत. कोपा अमेरिका स्पर्धेचा विचार करता मागील 5 सामन्यांत ब्राझील अर्जेंटीनावर भारी असून पाचपैकी ब्राझीलने 4 तर अर्जेंटीनाने 1 सामना जिंकला आहे.

कधी आणि कुठे पाहाल?

कोपा अमेरिका चषकाचा हा सामना 11 जुलैला पार पडणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना सोनीच्या स्पोर्ट्स चॅनेल्सवर पाहता येणार आहे. ज्यात Sony SIX HD/SD या चॅनेल्सवर सामना पाहता येईल. तसेच सामन्याची  लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLIV या डीजीटल प्लॅटफॉर्मवर पार पडेल.

हे ही वाचा :

Copa America 2021 : फायनलमध्ये मेस्सी आणि नेमार आमने-सामने, कोलंबियाला मात देत अर्जेंटीना अंतिम सामन्यात दाखल

Copa America 2021 : नेमारची जादू आणि ब्राझील अंतिम सामन्यात दाखल, पेरु संघावर अप्रितम विजय, पाहा व्हिडीओ

Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल

(Copa America Final Will Played in Argentina vs Brazil Messi vs Neymar Clash in Ground on 11 July)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.