EURO 2020 : इंग्लंडची कडवी झुंज अपयशी, युरो चषक इटलीच्या नावे!
तब्बल 55 वर्षांनी युरोच्या चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या इंग्लंडचं जेतेपदाचं स्वप्न अधुरंच राहिल. चुरशीच्या सामन्यात इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवत युरो चषक जिंकला.
लंडन : ऐतिहासिक वेम्बली स्टेडियमवर इटली आणि इंग्लंड (Italy vs England) यांच्यात युरो चषकाचा (Euro Cup 2020) अंतिम सामना रविवारी (मध्यरात्री) पार पडला. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी 1-1 गोल केला. त्यामुळे अखेर विजेता मिळवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले. त्यामध्ये इटलीच्या सर्व खेळाडूंनी विशेषत: गोलकिपरने अप्रतिम कामगिरी करत विजयश्री खेचून आणला आणि सामना इटलीने आपल्या नावे करत युरो चषक 2020 वर स्वत:चे नाव कोरले. (Euro 2020 Italy deafeated England in penalty Shoot out And Won Euro Cup 2020)
? ???????? ?’?????? ?
?? Congratulations Italy, EURO 2020 winners ???@azzurri | #ITA | #EURO2020 pic.twitter.com/62Ve8TMEFu
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 11, 2021
संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष लागून राहिलेल्या युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इटली आणि इंग्लंड दोन्ही संघानी अप्रतिम खेळाचे दर्शन घडवले. सामना सुरु होताच इंग्लंडच्या ल्यूक शॉ (Luke Shaw) याने अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. विशेष म्हणजे हा स्पर्धेतील सर्वात जलद गोल ठरला. त्यानंतर इटलीकडून या गोलची परतफेड करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. इंग्लंडने देखील बरीच आक्रमण केली. मात्र बराच वेळ दोन्ही संघानाही एकही गोल करता आला नाही. अखेर 67 व्य़ा मिनिटाला इटलीचे एक आक्रमण यशस्वी ठरले आणि लियोनार्डो बोनूची (Leonardo Bonucci) याने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 90 मिनिटे होऊन अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे विजेता कोण हे निश्चित करण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले.
गोलकिपरने तारले इटलीला
पेनल्टी शूटआउटमध्ये सुरुवातीला इटलीच्या डॉमेनिको बेरार्डीने पहिला गोल केला. त्यानंतर इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनने देखील अप्रतिम गोल दागत बरोबरी साधली. त्यानंतर इटलीच्या अँड्रिया बेलोट्टीकडून गोल हुकला तेव्हाच इंग्लंडच्या हॅरी मॅग्युरेने गोल केला. त्यामुळे इंग्लंडने 2-1 ची आघाडी घेतली. त्यानंतर इटलीच्या लेओनार्डो बोनुचीने गोल करत स्कोर 2-2 केला. त्यानंतर मात्र इंग्लंडचा स्टार युवा खेळाडू रॅशफोर्ड गोल करण्यास हुकला आणि इंग्लंडवर दडपण आले. इटलीकडून फेडेरिकोने गोल करत इटलीला 3-2 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडचा सँचोसचा गोल इटलीचा गोलकिपर डोनरमा याने अडवला. त्यानंतर इटलीच्या जॉर्जिओचा गोल इंग्लंडच्या गोलकिपरने अडवत सामना सुरु ठेवला. पण अखेर इंग्लंडच्या बुकायो साका याने मारलेली पेनल्टी किक अप्रतिम रित्या इचलीचा गोलकिपर डोनरमाने अडवली आणि अटीतटीच्या सामन्यात इटलीला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा :
Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल
Copa America Final Winner : विजयानंतर अर्जेंटीना संघाचा जल्लोष, मेस्सीला अश्रू अनावर, पाहा फोटो
(Euro 2020 Italy deafeated England in penalty Shoot out And Won Euro Cup 2020)