Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Copa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात

कोपा अमेरिका चषक 2021 मध्ये सेमीफायनलच्या सामन्यात अर्जेंटीनाने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये मात देत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. सामन्यात अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सीच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले असून रक्त येत असतानाही मेस्सीने संघासाठी अप्रितम खेळी केल्यामुळे सर्वचजण त्याचे कौतुक करत आहेत.

Copa America : Live मॅचमध्ये मेस्सीच्या पायातून रक्ताची धार, तरी सामन्यात दिमाखदार खेळ, संघाला पोहचवलं अंतिम सामन्यात
लिओनल मेस्सी
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 5:34 PM

ब्राझिलिया : फुटबॉलपटू लिओनल मेस्सी (Lionel Messi) हा फक्त सध्याच्याच नाहीतर फुटबॉल इतिहासातील महान खेळाडू पैकी एक आहे. त्याचे रेकॉर्ड, खेळण्याची स्टाईल, आतापर्यंत केलेले गोल हे सारं तो कुठल्या दर्जाचा खेळाडू आहे हे सांगतं. मेस्सीने त्याचा क्लब बार्सिलोना संघाला अनेक चषकं जिंकवून दिले आहेत. पण त्याची राष्ट्रीय टीम अर्जेंटीनाला अजूनपर्यंत मेस्सीच्या नेतृत्त्वात एकही मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं नाही. आता कोपा अमेरिका 2021 (Copa America 2021 ) मध्ये मेस्सीचा अर्जेंटीना संघ अंतिम सामन्यात पोहोचला असून ही स्पर्धा जिंकण्यासाठी मेस्सी जीवाचे रान करत आहे. याचाच प्रत्यय कोलंबिया (colombia) विरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात आला. या सामन्यादरम्यान मेस्सीच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पायातून रक्त येत होते मात्र तरीही देशासाठी मेस्सी खेळला आणि संघाला जिंकवूनही दिलं. (In Copa America 2021 Argentina vs Colombia Semi Final Match Lionel Messis Leg Injured and Blood Comes out from Left Foot still he Played)

1993 पासून अर्जेंटीना संघ एका मोठ्या विजयाची वाट पाहत आहे. यंदा ही संधी चालून आली आहे. कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत अर्जेंटीनाने मजल मारली असून आता ब्राझील संघासोबत त्यांचा सामना होणार आहे. संघाला इथवर आणण्यात सिंहाचा वाटा ठरला तो कर्णधार लिओनल मेस्सी याचा. मेस्सीने सुरुवातीपासून बहुतेक सर्वच सामन्यात गोल केले. सेमीफायनमध्येही मेस्सीने गोल नसला केला तरी त्याच्या अप्रतिम खेळीमुळेच सामना जिंकता आला. सोबतच त्याने पेनल्टी शुटआऊट दरम्यान पहिला गोल दागत संघाला आघाडी मिळवून दिली होती.

सामन्यादरम्यानच दुखापत

सामन्यात हाल्फ टाईमनंतर 1-1 असा स्कोर असताना  75 व्या मिनिटाला कोलंबियायाच्या गोलपोस्टकडे वेगात जाणाऱ्या मेस्सीला कोलंबियाच्या डिफेन्डरने टॅकल करत रोखलं. यावेळी मेस्सी जोरात खाली पडला. त्यामुळे अर्जेंटीनाला फ्रि कीक देण्यात आली. फ्री किक घेण्यासाठी मेस्सी उभा राहिला असता त्याच्या पायातून येणारे रक्त साऱ्यांनी पाहिले आणि सर्वचजण शॉक झाले. मेस्सी ती फ्रिकीक गोलमध्ये बदलू शकला नाही. पण अखेर पेनल्टी शुटआऊटमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात त्य़ाने महत्त्वाचा गोल केला.

अर्जेंटीनाची आघाडी, पण कोलंबियाचेही पुनरागमन

अर्जेंटीना आणि कोलंबिया यांच्यातील सामन्यात सुरुवातीच्या काही मिनिटांतच अर्जेंटीनाने गोल करत आघाडी घेतली होती. 7 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या लाटुरो मार्टिनेज (Lautaro Martínez) याने सामन्यात पहिला गोल करत संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिला हाल्फ संपेपर्यंत कोलंबियाचा संघ गोल करु शकला नाही. मात्र हाल्फ टाईमनंतर काही वेळाने म्हणजेत 61 व्या मिनिटाला लुइस डियाज (Luis Díaz) याने अर्जेंटीनाच्या गोलकीपरला चकवत गोल केला आणि सामन्यात कोलंबियाने 1-1 ची बरोबरी साधली. त्यानंतर मात्र दोनही संघाना एकही गोल करता न आल्याने सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटने घेण्यात आला.

गोलकिपर ठरला विजयाचा शिल्पकार

पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटीनाच्या कर्णधार मेसीने पहल्या शॉटवर गोल करत आघाडी घेतली. कोलंबियाने देखील पहिला गोल केला. त्यानंतर मात्र मागील महिन्यातच अर्जेंटीनाकडून पदार्पण करणाऱ्या गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज (Emiliano Martínez) अप्रतिम सेव्ह करत संघाला 3-2 च्या फरकाने विजय मिळवून दिला. या विजयासोबतच अर्जेंटीना अंतिम सामन्यात पोहचली असून विजयाचा खरा शिल्पकार ठरलेल्या मार्टिनेजचे सर्वांनीच अभिनंदन केले.

हे ही वाचा :

Copa America 2021 : फायनलमध्ये मेस्सी आणि नेमार आमने-सामने, कोलंबियाला मात देत अर्जेंटीना अंतिम सामन्यात दाखल

Copa America 2021 : नेमारची जादू आणि ब्राझील अंतिम सामन्यात दाखल, पेरु संघावर अप्रितम विजय, पाहा व्हिडीओ

Euro 2020 : बेल्जियमला मात देत इटली विजयी, सेमीफायनलमध्ये स्पेनशी होणार सामना

(In Copa America 2021 Argentina vs Colombia Semi Final Match Lionel Messis Leg Injured and Blood Comes out from Left Foot still he Played)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.