Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोल्सच्या जोरावर पोर्तुगालने हंगेरीवर दमदार विजय मिळवला. तर विश्वचषक विजेत्या फ्रान्सने जर्मनीचा 1-0 ने पराभव केला.

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत
पोर्तुगाल आणि हंगेरी सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 1:25 PM

बुडापेस्ट : युरो चषक 2020 (Euro Cup 2020) मध्ये मंगळवारी 15 जूनला दोन सामने पार पडले. ज्यातील पहिल्या सामन्यात स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल संघाने हंगेरीवर 3-0 च्या फरकाने दमदार विजय मिळवला. तर दुसरीकडे जागतिक फुटबॉलमधील मातब्बर संघ फ्रान्स (France) आणि जर्मनी (Germany) यांच्यातील सामन्यात जर्मनीच्या डिफेन्ड़रच्या एका चूकीमुळे जर्मनीला सामना गमवावा लागला. (In Euro 2020 Portugal won Against Hungary With Cristiano Ronaldos goal and France Beat Germany in second match)

पोर्तुगालने 8 मिनिटांत फिरवला सामना

पोर्तुगाल (Portugal) आणि हंगेरी (Hungary) यांच्यातील सामना सुरुवातीला तसा चूरशीचा होताना दिसत होता. हंगेरीकडून जास्त हल्ले होत नसले तरी त्यांचा डिफेन्स अप्रतिम असल्याने पोर्तुगालला गोल करता येत नव्हता. हंगेरीने जास्त लक्ष रोनाल्डोवर दिल्याने त्यालाही सामन्यात काही जादू करता येत नव्हती. त्यामुळे पहिल्या हाल्फमध्ये दोन्हीही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सामन्यच्या मध्यांतरादरम्यान स्कोर 0-0 होता. त्यानंतर दुसरा हाल्फही संपत आला सामना संपण्यासाठी 6 मिनिटं शिल्लक असतानाच पोर्तुगाच्या राफेल गुरेयराने (Raphael Guerreiro) अप्रतिम गोल करत पोर्तुगालला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हंगेरीच्या चूकीमुळे पोर्तुगालला एक पेनल्टी मिळाली. जी रोनाल्डोने अचूकरित्या घेत आघाडी 2-0 ची केली. त्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्ये रोनाल्डोने आणखी एक गोल करत हंगेरीवर आणखी एक हल्ला केला आणि 3-0 च्या फरकाने एका दमदार विजयाची नोंद केली. रोनाल्डोने या दोन गोल्ससह युरो चषकाच्या इतिहासात 11 गोल करत सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्डही आपल्या नावे केला.

जर्मनीची एक चूक आणि फ्रान्स विजयी

दिवसातील दुसऱ्या सामन्यात जर्मनीला फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागला. गतवर्षीच्या फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सने या विजयासह एफ ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दोन्ही संघ जागतिक फुटबॉलमधील मातब्बर संघ असल्याने दोघांतील सामना चूरशीचा होणार होता हे नक्की. दोन्ही संघाकडे उत्कृष्ट खेळाडूंची फौज आहे. त्यामुळे सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही संघ तोडीस तोड प्रदर्शन करत होते. पण 20 व्या मिनिटाला जर्मनीचा डिफेन्डर मॅट्स हुमेल्स (Mats Hummels) बॉलला फ्रान्सच्या स्टार खेळाडू एमबाप्पेपासून दूर करण्याच्या प्रयत्नात गोलपोस्टमध्ये टाकून बसला. त्यामुळे फ्रान्सला एक गोल मिळाला आणि त्यांनी 1-0 ची आघा़डी घेतली. त्यानंतर दोन्ही संघाना सामन्यात एकही गोल करता आला नाही आणि सामना फ्रान्सने 1-0 ने विजयी केला.

हे ही वाचा :

2023 AFC Asian Cup qualifiers : भारत vsअफगानिस्तान सामना अनिर्णीत, 7 मिनिटांत स्कोरबोर्डवर 2 गोल

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय

(In Euro 2020 Portugal won Against Hungary With Cristiano Ronaldos goal and France Beat Germany in second match)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.