Paralympics 2020: ऑलिम्पिकमधील उत्तम कामगिरीनंतर आता लक्ष्य पॅरालिम्पिक्स, भारताचं पहिलं दल टोक्योकडे रवाना
भारताने रिओ पॅरालिम्पिक्स, 2016 मध्ये 2 सुवर्णपदकांसह एकूण 4 पदकं खिशात घातली होती. यंदाही भारताचे खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये उत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली. त्यानंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही अशीच कामगिरी करुन जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. 24 ऑगस्टपासून टोक्योमध्येच पॅरालिम्पिक्स खेळांना (Tokyo Paralympics 2020) सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय पॅरा-एथलीट्सचा संघ बुधवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळीच टोक्योसाठी रवाना झाला आहे. रवाना झालेल्या 8 खेळाडूंमध्ये रिओ 2016 पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्णपदक विजेता एथलीट मरियप्पन थंगावेलुही आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हे सर्व खेळाडू टोक्योसाठी रवाना झाले असून यावेळी क्रिडा मंत्रालय, भारतीय खेल प्राधिकरण आणि भारतीय पॅरालिम्पिक समितिचे अधिकारीही उपस्थित होते.
थंगावेलु हा पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला भारतीय संघाचा ध्वजवाहक असेल. दरम्यान भालाफेकपटू टेक चंद आणि थाळीफेकपटू विनोद मलिक हेही टोक्योला रवाना होणार असून बुधवारी सायंकाळी दुसरे दल टोक्योसाठी रवाना होईल. यामध्ये भारतीय पॅरालिम्पिक समितिचे (PCI) अध्यक्षांसह 14 भारतीय असतील. रिओ पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेला भालाफेकपटू देवेंद्र झाझड़ियाही यांच्यासोबतच टोक्योला रवाना होईल.
Senior @Media_SAI & @IndiaSports Officers & PCI President @DeepaAthlete gave a send off to the first batch of #Paralympics athletes including #TeamIndia Flag-bearer @189thangavelu; @VinodMa23797758 & @MahlawatTek at Delhi IGI Airport! #Tokyo2020 ready to welcome our athletes!!?? pic.twitter.com/uEuj5KvLkn
— Paralympic India ?? #Cheer4India ? #Praise4Para (@ParalympicIndia) August 17, 2021
25 ऑगस्टपासून सुरु होणार भारताच्या स्पर्धा
पॅरालिम्पिकमध्ये 25 ऑगस्टपासून भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा सुरु होतील. दरम्यान खेळाडू टोक्योला रवाना होताना माजी पॅरा-एथलीट आणि PCI ची अध्यक्ष दीपा मलिक म्हणाली की, संपूर्ण देश, माननीय पंतप्रधान, क्रिडामंत्री सर्वांनाच तुमचा अभिमान असून स्पर्धेआधीच तुम्ही सर्व विजेते आहात. मी स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा देते.”
A huge thanks to @IndiaSports @Media_SAI for the warm farewell at the airport to the #Tokyo2020 Paralympic contingent. We were happy to see arrangements for a seamless process of departure . @ianuragthakur @ParalympicIndia @189thangavelu https://t.co/vZ6bipVIYS
— Deepa Malik (@DeepaAthlete) August 18, 2021
पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?
पॅरालिम्पिक्स ही देखील आंतरराष्ट्रीय अनेक खेळ खेळवण्यात येणारी क्रिडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकप्रमाणेच खेळ असतात. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. फक्त या ठिकाणी खेळणारे खेळाडू हे अपंगत्व असलेले असतात. ज्यात एखादा शरीराचा भाग नसणे, स्नायूंची कमतरता, पायाच्या लांबीत फरक, अत्यंत कमी उंची अशा अनेक प्रकारच्या शाररिक बाधा असणारे खेळाडू सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (IPC) या खेळांचे आयोजन केले जाते.
इतर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द पाळला, पीव्ही सिंधूला विजयानंतर दिलेलं Promise पूर्ण
टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार
(Indian Para athletes departed for Tokyo Paralympics 2020)