दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच निधन, भारताला पहिलं ऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या संघातील खेळाडू
दिग्गज हॉकीपटू केशव दत्त (Keshav Datt) यांनी पश्चिम बंगाल येथील त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. 1948 आणि 1952 च्या ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या हॉकी संघातील केशव हे महत्त्वाचे खेळाडू होते.
कोलकाता : स्वतंत्र भारतासाठी 1948 आणि 1952 साली ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हॉकी संघातील दिग्गज खेळाडू केशव दत्त (Keshav Datt) यांचे बुधवारी (7 जुलै) सकाळी पश्चिम बंगाल येथील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्त यांच्या निधनानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबम आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamta Banerjee) अशा अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. ममता यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की,‘हॉकी जगताने एका महान खेळाडूला गमावले. केशव दत्त यांच्या निधनाने मी दुखी आहे. ते 1948 आणि 1952 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकवणाऱ्या संघात होते. भारत आणि बंगालचे चॅम्पियन होते. त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्याबद्दल सहानुभूती (Indias First Hocky olympic Gold Medalist Winning Teams Hockey Legend Keshav Datt Dies in Bengal)
The world of hockey lost one of its true legends today. Saddened at the passing away of Keshav Datt. He was a double Olympic gold medal winner, 1948 and 1952. A champion of India and Bengal. Condolences to his family and friends.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) July 7, 2021
ऑलिम्पिक विजेत्या भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असणारे दत्त हे 1951-1953 आणि नंतर 1957-1958 मध्ये मोहन बागान या क्लबकडूनही खेळले होते. त्यांच्या उपस्थितीतच मोहन बागान संघाने 10 वर्षे हॉकी लीगमध्ये विजय मिळवला होता. 2019 मध्ये दत्त यांना मोहन बागान रत्न ही देण्यात आले होते.
हॉकी अध्यक्षांनीही व्यक्त केलं दुख
हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबम हे दत्त यांच्या निधनाबाबत माहिती देताना म्हणाले, ‘आज दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच्या निधनाने आम्ही सर्वजण दु: खी झालो आहोत. ते 1948 आणि 1952 ऑलिम्पिकमध्ये भारताल सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या संघातील एकमेव जीवित खेळाडू होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. हॉकी इंडियाला बातमीने फार दु: ख झाले असून मी हॉकी महासंघाच्यावतीने त्यांच्या कुटूंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो”
We mourn the loss of the former Indian Hockey player and two-time Gold Medallist at the 1948 and 1952 Olympics, Keshav Datt. ?
May his soul rest in peace. #IndiaKaGame #RestInPeace pic.twitter.com/7EV8nWzZyv
— Hockey India (@TheHockeyIndia) July 7, 2021
संबंधित बातम्या:
Dilipkumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा
(Indias First Hocky olympic Gold Medalist Winning Teams Hockey Legend Keshav Datt Dies in Bengal)