Wimbledon 2021, Men’s Final: नोव्हाक जोकोविचची विजयी घोडदौड सुरुच, फ्रेंच ओपननंतर विम्बल्डनमध्येही विजय
नोव्हाकचे हे सहावे विम्बल्डन आणि 20 वे ग्रँड स्लॅम ठरले. या विजयासोबतच त्याने राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
लंडन : नुकतीच फ्रेंच ओपन स्पर्धा (French Open 2021) जिंकणाऱ्या सर्बियाच्या स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवत आपल्या कारकिर्दीतील 6 वे विम्बल्डन पटकावले आहे. विशेष म्हणजे हे त्याचे 20 वे ग्रँड स्लॅम असल्याने त्याने रॉजर फेडरर (Roger Fedrar) आणि राफेल नदाल (Rafeal Nadal) यांच्या सर्वाधिक 20 ग्रँडस्लॅम मिळवण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे. नोव्हाकने अंतिम सामन्यात इटलीच्या मातेयो बेरेट्टिनीला (Matteo Berrettini) नमवत हा विजय मिळवला. (Novak Djokovic Wins his sixth Wimbledon Title by defeating Matteo Berrettini in Wimbledon Final)
नोव्हाक आणि मातेयो यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. पहिल्या सेटमध्ये मातेयो याने 6-7 च्या फरकाने विजय मिळवत आघाडी घेतली. पण नंतर नोव्हाकने दमदार पुनरागमन करत पुढील तिन्ही सेट्स 6-4, 6-4 आणि 6-3 च्या फरकाने जिंकत विजय मिळवला. तब्बल 3.24 तास हा रंगतदार सामना सुरु होता. नोव्हाकच्या या विजयासह मातेयो याचे स्वत:चे पहिले ग्रँड स्लॅम आणि देशाचे पहिले विम्बल्डन टायटल मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
? 2011 ? 2014 ? 2015 ? 2018 ? 2019 ? 2021#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/UrFvlsgIzY
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021
जोकोविचकडे इतिहास रचण्याची संधी
यंदाच्या वर्षी अप्रतिम फॉर्ममध्ये असणाऱ्या नोव्हाकला युएस ओपनचे ग्रँडस्लॅम जिंकून टेनिस विश्वातील सर्वाधिक ग्रँड स्लॅम आपल्या नावे करण्याची संधी मिळाली आहे. त्याने नदाल आणि फेडरर यांच्या इतकेच 20 ग्रँडस्लॅम जिंकल्याने आणखी एक ग्रँड स्लॅम त्याला या दोघांपुढे नेऊ शकते. तसेच यंदा त्याने आधी ऑस्ट्रेलियन ओपन मग फ्रेंच ओपन आणि आता विम्बल्डन स्पर्धा जिंकल्याने ऑलिम्पिक आणि अमेरिकन ओपन जिंकल्यास तो एक सुवर्ण इतिहास रचू शकतो.
हे ही वाचा –
EURO 2020 : इंग्लंडची कडवी झुंज अपयशी, युरो चषक इटलीच्या नावे!
(Novak Djokovic Wins his sixth Wimbledon Title by defeating Matteo Berrettini in Wimbledon Final)