AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PKL 2021-22 Bengaluru Bulls vs Puneri paltan: बेंगळुरु बुल्सचा पुण्यावर मोठा विजय

पुण्याकडून एकही खेळाडू मोठी कामगिरी करु शकला नाही. पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही बेंगळुरुने विजय मिळवला.

PKL 2021-22 Bengaluru Bulls vs Puneri paltan: बेंगळुरु बुल्सचा पुण्यावर मोठा विजय
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 9:52 PM
Share

बेंगळुरु: प्रो कबड्डी लीगमध्ये आज झालेल्या सामन्यात बेंगळुरु बुल्सने पुणेरी पल्टनचा 40-29 असा तब्बल 11 पॉईंटसच्या फरकाने दणदणीत पराभव केला. आजच्या पराभवामुळे कोच अनुप कुमारच्या पुणेरी पल्टनची स्थिती खूप खराब झाली आहे. गुण तालिकेत पुणे शेवटच्या स्थानावर आहे. पाच सामन्यात त्यांच्या खात्यावर फक्त चार गुण जमा आहेत. (PKL 2021-22 Bengaluru Bulls beat puneri paltan)

दुसऱ्या बाजूला बेंगळुरुचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. बंगळुरु बुल्सकडून पवन कुमारने दमदार कामगिरी करत 11 पॉईंटस मिळवले. बंगळुरुने रेड मध्ये पुण्यापेक्षा सरस कामगिरी करुन 23 पॉईंट मिळवले. पुण्याकडून एकही खेळाडू मोठी कामगिरी करु शकला नाही. पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही बेंगळुरुने विजय मिळवला. यंदाच्या हंगामात दिल्ली आणि बंगळुरु दोन्ही संघ फॉर्ममध्ये आहेत. दिल्लीकडून नवीन कुमार आणि बेंगळुरुकडून पवन कुमारचं दमदार प्रदर्शन सुरु आहे.

काल शेवटच्या क्षणाला पवन कुमारने बेंगळुरुचा पराभव टाळला बेंगळुरु बुल्स विरुद्ध तेलगु टायटन्स हा प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील कालच्या दिवसातील सलग दुसरा सामना टाय झाला. दोन्ही संघांचे प्रत्येकी 34-34 गुण झाले. बेंगळुरूचा स्टार पवन कुमार संपूर्ण सामन्यात विशेष चमक दाखवू शकला नाही. पण शेवटच्या क्षणाला टायटन्सचा रेडर रोहित कुमारची पकड करुन संघाला पराभवपासून वाचवलं. यू मुंबाकडून सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर बेंगळुरु बुल्सने सलग तीन विजय मिळवले होते.

संबंधित बातम्या:

‘मी नीट लक्ष देऊन ऐकलं, तो रडण्याचा आवाज माझ्या बायकोचा होता’, अश्विनने सांगितला ऑस्ट्रेलियातला किस्सा IND vs SA: ‘घाबरुन जाण्याची गरज नाही’, दुसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकन कर्णधाराचं वक्तव्य IND vs SA ODI Team: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला संघ

(PKL 2021-22 Bengaluru Bulls beat puneri paltan)

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.