PKL 2021-22 LIVE Score and Updates, Bengaluru Bulls VS U Mumba : अभिषेक सिंगची शानदार कामगिरी, यू मुंबाची बेंगलुरुवर 46-30 अशी मात

| Updated on: Dec 22, 2021 | 8:52 PM

आजपासून प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League ) थरार रंगणार आहे. ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होत आहेत.

PKL 2021-22 LIVE Score and Updates, Bengaluru Bulls VS U Mumba : अभिषेक सिंगची शानदार कामगिरी, यू मुंबाची बेंगलुरुवर 46-30 अशी मात
Bengaluru Bulls vs U Mumba

बंगळरु : आजपासून प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League ) थरार सुरु झाला आहे. ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होत आहेत. दरम्यान, यंदाचा मोसमातील पहिला सामना बंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुंबा यांच्यात खेळवण्यात आला. या उद्घाटनाच्या सामन्यात यू मुंबाने बेंगलुरु बुल्सवर 16 पॉईंट्सनी मात करत स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. अभिषेक सिंग मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला.

मुंबईने या सामन्यात बंगळुरुवर 46-30 अशी मात केली आहे. मुंबईच्या अभिषेक सिंगने या सामन्यात तब्बल 19 पॉईंट्स मिळवत बंगळुरुचं कंबरडं मोडलं. त्याने 15 रेड पॉईंट्स आणि 4 बोनस पॉईंट्स मिळवले. अभिषेकव्यतिरिक्त मुंबईच्या रेडर अजित कुमारने 6 पॉईंट्स मिळवले. तर मुंबईच्या बचाव फळीनेदेखील शानदार कामगिरी केली. हरेंद्र कुमारने 4 टॅकल पॉईंट्स मिळवले, तर आशिष कुमारने 3, रिंकूने 2 टॅकल पॉईंट्स मिळवले. कर्णधार फजल अत्राचली आणि मोहसेनने 1 टॅकल पॉईंट मिळवला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Dec 2021 08:35 PM (IST)

    बंगळुरुचा संघ तिसऱ्यांदा ऑल आऊट

    55 मिनिटात यू मुंबाने बेंगलुरु बुल्सला तिसऱ्यांदा ऑलआऊट केलं आहे. त्यामुळे मुंबईने आतापर्यंत 44-28 अशी अघाडी मिळवली आहे.

  • 22 Dec 2021 08:18 PM (IST)

    पहिल्या स्ट्रॅटेजिक टाईमआऊटपर्यंत मुंबईची 32-24 आघाडी

    पहिल्या स्ट्रॅटेजिक टाईमआऊटपर्यंत मुंबईने बंगळुरुवर 32-24 आघाडी मिळवली आहे.

  • 22 Dec 2021 08:00 PM (IST)

    पहिल्या हाफमध्ये अभिषेकचे 14 पॉईंट्स

    पहिल्या हाफमध्ये अभिषेक सिंगने 14 रेड्समध्ये 14 पॉईंट्स मिळवले आहेत. त्याने 11 रेड पॉईंट्स आणि 3 बोनस पॉईंट्स मिळवले आहेत.

  • 22 Dec 2021 07:56 PM (IST)

    अभिषेकचा शानदार कारनामा, एकाच रेडमध्ये 4 गुण

    यू मुंबाचा संघ ऑल आऊट होणार होता, मात्र 20 व्या मिनिटाला अभिषेक सिंगने एकाच रेडमध्ये बंगळुरुच्या 3 खेळाडूंना बाद केलं, तसेच एक बोनस पॉईंटदेखील मिळवला.

  • 22 Dec 2021 07:49 PM (IST)

    पहिल्या 15 मिनिटात अभिषेक सिंगच्या खात्यात अर्धा डझन गुण

    पहिल्या 15 मिनिटात यू मुंबाच्या अभिषेक सिंगने 6 गुण मिळवले आहेत. त्यात 5 रेड पॉईंट्स आणि एका बोनसचा समावेश आहे.

  • 22 Dec 2021 07:42 PM (IST)

    यू मुंबाची दणक्यात सुरुवात

    पहिल्या 15 मिनिटात यू मुंबाने 12-8 अशी आघाडी घेतली आहे.

  • 22 Dec 2021 07:32 PM (IST)

    यू मुंबा संघ

    यू मुंबा: अभिषेक सिंह, व्ही. अजिक कुमार, अजिंक्य कापरे, पंकज फाझल अत्राचाली, सुनील सिद्धगवळी, हरींदर कुमार

  • 22 Dec 2021 07:31 PM (IST)

    बेंगळुरु बुल्स संघ

    बेंगळुरु बुल्स: पवन कुमार शेरावत, चंद्रन रणजीत, दीपक नरवाल, महेंदर सिंह, सौरभ नानडाल, अमित शीओरॅन, अंकित

Published On - Dec 22,2021 7:42 PM

Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.