Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R Madhavan In Dubai : आर. माधवन पत्नीसह दुबईत शिफ्ट, मुलगा वेदांतच्या करिअरसाठी घेतला निर्णय

आर माधवन(R Madhavan)चा मुलगा वेदांत (Vedaant) यानं 2026च्या ऑलिम्पिक(Olympics)ची तयारी सुरू केलीय. तो आपली पत्नी सरितासह आपल्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी दुबई(Dubai)ला गेलाय. वेदांत एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू (National Swimming Champion) आहे.

R Madhavan In Dubai : आर. माधवन पत्नीसह दुबईत शिफ्ट, मुलगा वेदांतच्या करिअरसाठी घेतला निर्णय
मुलगा वेदांतसह अभिनेता आर माधवन
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 4:39 PM

मुंबई : आर. माधवन(R Madhavan)चा मुलगा वेदांत (Vedaant) यानं 2026च्या ऑलिम्पिक(Olympics)ची तयारी सुरू केलीय. मात्र, सध्या देशात सुविधांचा अभाव असल्यानं तो आपली पत्नी सरितासह आपल्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी दुबई(Dubai)ला गेलाय. वेदांत एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू (National Swimming Champion) आहे.

‘पुरेशा सुविधा मिळायला हव्या’ माधवन आणि त्याच्या पत्नीची इच्छा होती, की त्यानं सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेची तयारी करत असताना त्याला सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात. माधवननं एका मुलाखतीत सांगितलं, की आमचं कुटुंब दुबईमध्ये आहे जेणेकरून त्याच्या मुलाला मोठ्या तरणतलावामध्ये प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीनं प्रवेश मिळावा.

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

‘आम्ही त्याच्या पाठीशी’ मुंबईतले मोठे जलतरण तलाव एकतर कोविडमुळे बंद आहेत. जे आहेत तेही खूप अंतरावर आहेत. आम्ही इथं दुबईमध्ये वेदांतसोबत आहोत. इथं त्याला मोठ्या तलावांमध्ये प्रवेश आहे. तो ऑलिम्पिकची तयारी करतोय. मी आणि सरिता (त्याची पत्नी) त्याच्या पाठीशी आहोत, असं माधवन म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

‘माझ्या करिअरपेक्षा हे महत्त्वाचं’ मुलाच्या भविष्याविषयी तो म्हणाला, की पालक या नात्यानं त्याला ज्यामध्ये आवड आहे, ते क्षेत्र निवडावं. पालक म्हणून आम्ही त्याचासोबत आहोत. तो वेगवेगळ्या स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकतोय. आम्हाला खूप अभिमान वाटू लागलाय. त्यानं अभिनयाचं क्षेत्र नाकारलं, याबद्दल मला कोणतंही दु:ख नाही. त्यानं निवडलेलं क्षेत्र माझ्या करिअरपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं मी मानतो. मुलांवर दबाव टाकून त्यांच्या करिअरला आकार देता येणार नाही. त्यामुळे अभिनयापेक्षा त्याला खेळात अधिक रस असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही पालक म्हणून त्याला पूर्ण पाठिंबा दिला. आता ऑलिम्पिकच्या दृष्टीनं जे काही आवश्यक असेल, त्या सर्व सुविधा पुरवण्याकडे लक्ष देऊ, असं त्यानं सांगितलं.

Armaan Kohli | अभिनेता अरमान कोहलीला मोठा धक्का, ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्यास न्यायालयाचा नकार!

Bigg Boss Marathi 3 | सोनाली पाटीलनंतर ‘बिग बॉस मराठी’तून आणखी एका स्पर्धकाचे एलिमिनेशन

India south africa tour: पहिल्या कसोटीत स्टेडियममध्ये प्रेक्षकांमधून ‘इंडिया, इंडिया’चा जयघोष ऐकू येणार नाही, कारण….

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.