शरद पवार, लांडगे आखाड्यातून बाहेर, कुस्तीगीर परिषदेचा राजीनामा, नागपूरच्या खासदाराकडे अध्यक्षपदाची सूत्रे

क्रीडा क्षेत्रात नवीन कायदा आला आहे. त्यानुसार 80 वर्षावरील व्यक्ती संघटनेच्या पदावर राहू शकत नाही. या नवीन कायद्याची कुस्ती महासंघाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवार, लांडगे आखाड्यातून बाहेर, कुस्तीगीर परिषदेचा राजीनामा, नागपूरच्या खासदाराकडे अध्यक्षपदाची सूत्रे
शरद पवार, लांडगे आखाड्यातून बाहेर, कुस्तीगीर परिषदेचा राजीनामाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 7:28 AM

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे अखेर कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडले आहेत. शरद पवार आणि लांडगे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता कुस्तीगीर परिषदेची सर्व सूत्रे नागपूरचे खासदार रामदास तडस यांच्याकडे आली आहेत. तसेच पुण्यात होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीच अधिकृत असणार आहे. तसं शिक्कामोर्तबच काल झालेल्या बैठकीत करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कुणाची? या परिषदेचं नेतृत्व तडस गटाकडे की लांडगे गटाकडे? राज्यात कुस्ती स्पर्धा कुठे होणार? आणि कोण ही स्पर्धा घेणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर त्यावर आज पडदा पडला आहे. काल पुण्यातील बारामती हॉस्टेलला झालेल्या तातडीच्या बैठकीत कुस्तीगीर परिषदेत मोठे निर्णय घेण्यात आले.

हे सुद्धा वाचा

याच बैठकीत शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे यांनी पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्याबाबतचंपत्रं भारतीय कुस्ती महासंघालाही देण्यात आलं. काल झालेल्या बैठकीनुसार खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तर शरद पवार हे परिषदेचे मुख्य आश्रयदाते राहतील. लांडगे हे उप आश्रयदाते राहणार आहेत. यापूर्वी लांडगे यांच्याकडे परिषदेचं सचिव पद होतं.

परिषदेच्या नव्या कार्यकारिणीत दयानंद भक्त यांच्याकडे सचिवपद देण्यात आलं आहे. अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्याकडे कार्याध्यक्षपद तर अमृता भोसले यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आलं आहे. ही चारही महत्त्वाची पदे असून त्यावरील नियुक्त्या तातडीने करण्यात आल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रात नवीन कायदा आला आहे. त्यानुसार 80 वर्षावरील व्यक्ती संघटनेच्या पदावर राहू शकत नाही. या नवीन कायद्याची कुस्ती महासंघाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच शरद पवार, बाळासाहेब लांडगे, नामदेवराव मोहिते, संभाजी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात घेण्याची घोषणा केली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली आणि पुण्यातच महाराष्ट्र केसरी परिषद घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.