Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tokyo Paralympics खेळांसाठी अवघे जग सज्ज, गूगलनेही तयार केले खास डूडल

Google Doodle : नुकतील टोक्यो ऑलिम्पिक्स पार पडली असून आता त्याच ठिकाणी पॅरालिम्पिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत. जगभरातील पॅरा एथलिट्स या खेळांमध्ये सहभाग घेणार आहेत.

Tokyo Paralympics खेळांसाठी अवघे जग सज्ज, गूगलनेही तयार केले खास डूडल
Google doodle about tokyo paralympics
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 11:30 AM

Tokyo Paralympics : कोरोनाच्या संकटामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) अखेर यावर्षी पार पडल्या. त्यानंतर आता पॅरालिम्पिक्स खेळांचं (Tokyo Paralympics 2020) आयोजन  करण्यात आलं असून आजपासून (24 ऑगस्ट) या खेळांना सुरुवात होणार आहे. जगभरातील पॅरा एथलिट्स या खेळांमध्ये सहभाग घेणार आहेत. दरम्यान गूगलने देखील पॅरालिम्पिक्स खेळासांठी एक खास डूडल तयार केलं असून या डूडलवर क्लिक करताच एक अॅनिमेटेड व्हिडीओही तुम्हाला पाहायला मिळेल तर हा व्हिडीओ तयार केला असून एक फ्लॅश गेमही तुम्हाला विनामूल्य खेळता येणार आहे. हा गेम आणि व्हिडीओ पाहण्यासाठी या LINK वर क्लिक करा.

भारताकडून 54 खेळाडू पॅरालिम्पिक्समध्ये

24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पार पडणाऱ्या या खेळांमध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये भारताकडून 9 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 54 पॅरा-एथलीट सहभाग घेतील. या सर्वांना नरेंद्र मोदींपासून ते क्रिडामंत्री अशा संपूर्ण भारतवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान भारताचे या स्पर्धेतील सामने खालीलप्रमाणे असतील…

25 ऑगस्ट टेबल टेनिस -पहिला सामना सोनलबेन मुधभाई पटेल -दुसरा सामना- भाविना हसमुखभाई पटेल

27 ऑगस्ट तिरंदाजी -पुरुष गट- हरविंदर सिंह, विवेक चिकारा -पुरुष गट- राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी -महिला गट- ज्योती बालियान -महिला गट – ज्योति बालियान आणि टीबीसी

27 ऑगस्ट पॉवरलिफ्टिंग -पुरुष- 65 किलो गट- जयदीप देसवाल -महिला- 50 किलो गट- सकीना खातून

27 ऑगस्ट स्विमिंग -सुयश जाधव

28 ऑगस्ट अ‍ॅथलेटिक्स -पुरुष भालाफेक- रंजीत भाटी

29 ऑगस्ट अ‍ॅथलेटिक्स -पुरुष थाली फेक- विनोद कुमार -पुरुष उंच उडी – निशाद कुमार, राम पाल

30 ऑगस्ट अ‍ॅथलेटिक्स -पुरुष थाली फेक – योगेश कथुनिया -पुरुष भालाफेक – सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाजरिया -पुरुष भालाफेक – सुमित अंटिल, संदीप चौधरी

30 ऑगस्ट नेमबाजी – पुरुष 10 मीटर एयर रायफल – स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी – महिला 10 मीटर एयर रायफल – अवनी लेखारा

31 ऑगस्ट नेमबाजी – पुरुष १० मीटर एयर पिस्टल – मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज – महिला १० मीटर एयर पिस्टल – रुबिना फ्रांसिस

31 ऑगस्ट अ‍ॅथलेटिक्स -पुरुष उंच उडी- शरद कुमार, मारियप्पन थंगावेलू, वरूण भाटी -महिला 100 मीटर – सिमरन -महिला शॉटपुट – भाग्यश्री माधवराव जाधव

1 सप्टेंबर बॅडमिंटन – पुरुष एकेरी – प्रमोद भगत, मनोज सरकार -महिला एकेरी- पलक कोहली -मिश्र दुहेरी – प्रमोद भगत आणि पलक कोहली

1 सप्टेंबर अ‍ॅथलेटिक्स पुरुष क्लब थ्रो – धर्मबीर नैन, अमित कुमार सरोहा

2 सप्टेंबर बॅडमिंटन -पुरुष एकेरी – सुहास लालिनाकेरे यातिराज, तरुण ढिल्लन -पुरुष एकेरी- कृष्णा नागर -महिला एकेरी – पारुल परमार -महिला मिश्र – पारुल परमार आणि पलक कोहली

2 सप्टेंबर पॅरा कॅनॉइंग महिला गट- प्राची यादव

2 सप्टेंबर तायक्वांडो -महिला गट – 49 किलो- अरुणा तंवर

2 सप्टेंबर नेमबाजी -मिक्स्ड – 25 मीटर पिस्टल – आकाश आणि राहूल जाखड

3 सप्टेंबर नेमबाजी -पुरुष – 50 मीटर रायफल – दीपक सैनी -महिला – 50 मीटर रायफल – अवनी लेखारा

3 सप्टेंबर स्विमिंग -350 मीटर बटरफ्लाई- सुयश जाधव, निरंजन मुकुंदन

3 सप्टेंबर अ‍ॅथलेटिक्स -पुरुष उंच उडी – प्रवीण कुमार -पुरुष भालाफेक – टेक चंद -पुरुष शॉटपुट – सोमन राणा -महिला क्लब थ्रो – एकता भ्यान, कशिश लाकडा

4 सप्टेंबर नेमबाजी – मिक्स्ड राउंड – 10 मीटर एयर रायफल – दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू आणि अवनी लेखारा – मिक्स्ड राउंड – 50 मीटर पिस्टल – आकाश, मनीष नरवाल आणि सिंहराज

4 सप्टेंबर अ‍ॅथलेटिक्स -पुरुष भालाफेक – नवदीप सिंह

5 सप्टेंबर नेमबाजी -मिक्स्ड राउंड – 50 मीटर रायफल-दीपक सैनी, अवनि लेखारा आणि सिद्धार्थ बाबू

पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?

पॅरालिम्पिक्स ही देखील आंतरराष्ट्रीय अनेक खेळ खेळवण्यात येणारी क्रिडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकप्रमाणेच खेळ असतात. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. फक्त या ठिकाणी खेळणारे खेळाडू हे अपंगत्व असलेले असतात. ज्यात एखादा शरीराचा भाग नसणे, स्नायूंची कमतरता, पायाच्या लांबीत फरक, अत्यंत कमी उंची अशा अनेक प्रकारच्या शाररिक बाधा असणारे खेळाडू सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (IPC) या खेळांचे आयोजन केले जाते.

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

(Spcial doodle created by google for tokyo Paralympic 2020)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.