AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : मुलाचा अनोखा हेअर कट, द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

WWE या स्पर्धेत भारताचा पैलवान द ग्रेट खलीची (The great Khali) चर्चा नेहमी असते. भारतात WWE च्या फॅन्सची संख्या मोठी आहे.

VIDEO : मुलाचा अनोखा हेअर कट, द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स
The great Khali
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 1:58 PM
Share

मुंबई : WWE या स्पर्धेत भारताचा पैलवान द ग्रेट खलीची (The great Khali) चर्चा नेहमी असते. भारतात WWE च्या फॅन्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे खलीच्या चाहत्यांची संख्याही मोठी असणे स्वाभाविक आहे. खलीचं खरं नाव दलीप सिंह राणा (Dalip Singh Rana) आहे. खली सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. (The great Khali WWE Wrestler Dalip Singh Rana Instagram video viral)

इन्स्टाग्रामवर खली नेहमी पोस्ट करत असतो. आपला दिनक्रमही तो चाहत्यांसोबत शेअर करत राहतो. सोशल मीडियावर जसं लाईक्स मिळतं, तसं ट्रोलही केलं जातं. खलीने नुकतंच ट्रोलिंगला कंटाळून कमेंट सेक्शन बंद केला होता. आता खलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये खली एका मुलाचा हेअर कट करताना दिसतो. या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. काही लोक तर खलीकडे भलत्याच मागण्या करत आहेत. एकाने कमेंट केलीय, या मुलाला पकडून त्याचा ब्रश बनवा आणि बाथरुम साफ करा. दुसरा युजर म्हणतो, खली सर एक फूक मारा आणि याला टकला करुन टाका, अशा भन्नाट कमेंट खलीच्या पोस्टवर केल्या जात आहेत.

द ग्रेट खलीची इन्स्टा पोस्ट 

सध्या WWE पासून दूर

आपल्या भव्य अशा उंचीमुळे प्रसिद्ध असणारा खली WWE मधील महत्त्वाच्या रेसलरमध्ये गणला जातो. खलीची उंची 7 फूट 1 इंच इतकी आहे. सध्या खली भारतातच असल्याने तो WWE मध्ये खेळत नाही. खलीने आपली शेवटची मॅच ऑक्टोबर, 2014 मध्ये रूसेव सोबत खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत खली एकही सामना खेळलेला नाही. WWE शिवाय खलीने प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉसमध्ये देखील काम केले आहे. त्याचसोबत त्याने काही बॉलिवूड फिल्म्समध्येही काम केले आहे.

खलीने WWE च्या रिंगमध्ये अंडरटेकर, केन, बिग शो, जॉन सिना, ऑन मायकल यासारख्या खेळाडूंविरुद्ध सामने खेळले आहेत.

संबंधित बातम्या  

फॅन्सच्या ट्रोलिंगने वैतागला The Great Khali, उचललं ‘हे’ पाऊल

VIDEO : कच्च्या रस्त्यावर द ग्रेट खलीची बुलेट रायडिंग, व्हिडीओला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

(The great Khali WWE Wrestler Dalip Singh Rana Instagram video viral)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.