P. V. Sindhu: पी व्ही सिंधूला दुखापतीमुळे मोठा धक्का, कॉमनवेल्थची चॅम्पियन सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर
या महिन्यात जपानच्या टोकियो शहरात 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत BWF वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात माजी महिला सिंगल्स चॅम्पियन पी व्ही सिंधू ही सहभागी होऊ शकणार नाहीये. सिंधूला नुकत्याच झालेल्या क़ॉमनवेल्थ गेम्समध्ये दुखापतीचा सामना करवा लागला आहे.
नवी दिल्ली – कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू (P V sindhu)हिने देशासाठी संस्मरणीय गोल्ड मेडल जिंकले. सिंधूने पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG) महिला सिंगल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले. मात्र हे गोल्ड मेडल मिळवण्यासाठी तिला अडचणांनाही सामोरे जावे लागले. आता त्या अडचणींची किंमत तिला चुकवावी लागत आहे. गोल्ड मेडल जिंकण्याच्या प्रयत्नासाठी, सिंधूने दुखापत असतानाही फायनल मॅच खेळली. आता तीच दुखापत गंभीर झाली आहे. या कारणामुळे या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या स्पर्धेत (World championship tournament)ती खेळू शकणार नाही. कॉमनवेल्थ गेम्सची फायनल जिंकून परत हैदराबादमध्ये आल्यानंतर तिने एमआरआय केला. त्यात तिच्या डाव्या पायाला स्ट्रेस फॅक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुखापतीचा त्रास होत असल्याने वर्ल्ड चॅम्पियनशीप खेळू शकणार नसल्याचे पत्रक तिने प्रसिद्ध केले आहे. डॉक्टरांनी काही आठवडे विश्रांतीला सल्ला दिल्याचा उल्लेखही तिने यात केला आहे. काही काळानंतर पुन्हा ट्रेनिंग सुरु करेन असेही तिने लिहिलेले आहे.
हे सुद्धा वाचा— Pvsindhu (@Pvsindhu1) August 13, 2022
दुखापत असतानाही देशासाठी खेळली
या महिन्यात जपानच्या टोकियो शहरात 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत BWF वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात माजी महिला सिंगल्स चॅम्पियन पी व्ही सिंधू ही सहभागी होऊ शकणार नाहीये. सिंधूला नुकत्याच झालेल्या क़ॉमनवेल्थ गेम्समध्ये दुखापतीचा सामना करवा लागला आहे. महिला सिंगल्सच्या सेमीफायनलचया मॅचमध्ये सिंधूला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही मोठा संघर्ष तिने ही मॅच जिंकली होती. इतकेच नाही तर 8 ऑगस्टला झालेल्या फायनलमध्येही दुखापत असतानाही खेळत तिने देशासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. दुखापतीचा त्रास सहन करत तिने ही मॅच खेळली होती. आता मात्र याच दुखापतीमुळे ती वर्ल्ड चॅम्पियनशीपला मुकणार आहे.
पी व्ही सिंधू अनेक भारतीय खेळाडूंचे प्रेरणास्थान
दोन ऑलिपिंक पदके जिंकणारी आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल मिळवणारी पी व्ही सिंधू ही पहिली भारतीय महिला प्लेयर ठरलेली आहे. पी व्ही सिंधू हिचे आई वडीलही आंध्र प्रदेशातून राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. ते वॉलिबॉल प्लेअर्स होते. त्यांच्यामुळे तिच्या जगण्यात क्रीडा प्रकारांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यानंतर सिंधू पुलेला गोपीचंद यांच्या अकॅडमीत सामील झाली. ज्युनियर बॅडमिंटन टायटल्स आणि ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशीप जिंकून तिने आंतरराष्ट्रीय प्रतिभा असल्याचे सिद्ध केले.