तलाक… तलाक… तलाक… तीन निकाह, एक अफेयर; शोएब मलिकच्या नको त्या भानगडींची तुफान चर्चा
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा तूफान चर्चेत आहे. शोएब मलिक याने आता नुकताच तिसरे लग्न केले. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे विभक्त झाले आहेत. नुकताच आता शोएब मलिक याने तिसऱ्या लग्नाचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळतंय.
मुंबई : सानिया मिर्झा हिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने नुकताच तिसरे लग्न केलंय. सानिया मिर्झा हिच्या अगोदर देखील शोएब मलिक याचे एक लग्न केले होते. आता अचानकपणेच शोएब मलिक याने तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न केले. आता सानिया मिर्झा हिच्यासोबतच सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना या नुकताच जाहिर केल्या.
सानिया मिर्झा हिचे शोएब मलिक याच्यासोबतचे पहिले लग्न होते. मात्र, शोएब मलिक याचे सानियासोबतचे दुसरे लग्न होते. सानिया मिर्झा हिच्या अगोदर शोएब मलिक याचे आयशा सिद्दीकी हिच्यासोबत लग्न झालेले. धक्कादायक म्हणजे सानिया हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर शोएबने आयशासोबत घटस्फोट देखील घेतला नव्हता.
शोएब मलिक याने कधीच आयशा हिच्यासोबतचे लग्न मान्य केलेच नाही. आता शोएब मलिक याने सानिया हिच्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. पहिली पत्नी जाड असल्याने शोएब मलिक याला ती आवडत नसल्याचे सांगितले जाते. अनेक अभिनेत्रींसोबत देखील शोएब मलिक याचे नावे जोडली गेली आहेत.
शोएब मलिक कायमच नको त्या भानगडींमुळे चर्चेत असतो. यापूर्वी आयशा उमर हिच्यासोबत देखील शोएब मलिक याने अत्यंत हाॅट असे फोटोशूट केले. ज्यानंतर अनेक चर्चा रंगताना दिसल्या. हेच नाही तर थेट पाण्यामध्ये शोएबने आयशा उमर हिच्यासोबत फोटोशूट केले. शोएब मलिक याचे हे तिसरे लग्न जरी असले तरीही अनेक मुलींसोबत त्याचे अफेअर असल्याचे सांगितले जाते.
आयशा उमर हिच्यासोबत केलेल्या फोटोशूटनंतर आयशा उमर आणि शोएब मलिक हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता थेट शोएब मलिक याने आयशा सिद्दीकी हिच्यासोबत लग्न केले. विशेष बाब म्हणजे आयशा सिद्दीकी हिचे देखील हे दुसरे लग्न आहे. पाकिस्तानी अभिनेत्यासोबत आयशा सिद्दीकी हिचे पहिले लग्न झालेले. मात्र, तिचे ते लग्न फार काळ टिकू शकले नाही.