Arjun Tendulkar ‘या’ महिला क्रिकेटरला करतोय डेट! खास फोटो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री? 'या' महिला क्रिकेटरसोबत स्पॉट झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात पहिली विकेट घेतली. म्हणून अर्जुन तेंडुलकर चर्चेचा केंद्रबिंदू राहिला. पण आता अर्जुन एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र अर्जुनच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे. अर्जुन एका महिला क्रिकेटपटूला डेट करत असल्यााच्या चर्चांनी जोर धरला आहे. अर्जुनला ‘या’ महिला क्रिकेटपटूसोबत एका हॉटेलमध्ये लंचसाठी गेला होता. अर्जुनसोबत दिसणारी महिला क्रिकेटपटू दुसरी तिसरी कोणी नसून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट आहे. सध्या अर्जुन आणि डॅनियल यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोवर अनेक चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
अर्जुन सध्या तुफान चर्चेत असून, तो डॅनियल वॅट हिच्यासोबत एका हॉटेलमध्ये लंचसाठी गेला होता. डॅनियल वॅट हिने अर्जुन याच्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. याआधी देखील अर्जुन आणि डॅनियल यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. पण आता त्यांचा फोटो समोर आल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.
अर्जुनने मोडला वडिलांचा रेकॉर्ड अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल 2023 मध्ये सनराजयर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिली विकेट घेतली. अर्जुनने भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं. अर्जुनने यासह सचिन तेंडुलकर याचा विकेट न घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच अर्जुन तेंडुलकर कुंटुबातून आयपीएलमध्ये विकेट घेणारा पहिलाच सदस्य ठरला आहे.
क्रिकेट विश्वात पाय ठेवल्यानंतर घराणेशाहीवरून अर्जुन तेंडुलकर याच्यावर निशाणा साधण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून घराणेशाहीवरून अर्जुनची खिल्ली उडवणाऱ्यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
पंजाब किंग्जची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटाने अर्जुनबद्दल एक ट्वीट केलं आहे. सध्या प्रीतीचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रीती ट्विट करत म्हणाली, ‘अनेकांनी घराणेशाहीवरून अर्जुनची खिल्ली उडवली. पण अर्जुनने स्वतःची जागा कशी निर्माण करायची हे देखवून दिलं आहे. अर्जुन तुला खूप शुभेच्छा… सचिन तुमच्यासाठी ही नक्कीच अभिमानस्पद बाब आहे.’ असं प्रीती ट्विट करत म्हणाली.