Sania-Shoaib: घटस्फोटाच्या वृत्तांदरम्यान सानिया मिर्झा-शोएब मलिकची मोठी घोषणा

Sania Mirza Divorce: सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या नव्या घोषणेने भडकले फॅन्स, म्हणाले..

Sania-Shoaib: घटस्फोटाच्या वृत्तांदरम्यान सानिया मिर्झा-शोएब मलिकची मोठी घोषणा
Sania Mirza and Shoaib MalikImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 1:34 PM

लाहोर: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु आहे. दोन्ही देशाच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये याबद्दल वेगवेगळे दाव केले जात आहेत. दरम्यान या जोडप्यासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. घटस्फोटाच्या वृत्तांदरम्यान सानिया आणि शोएबने मोठी घोषणा केली आहे.

सानिया-शोएबच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना, या जोडप्याचा एक नवीन शो पाकिस्तानात येणार आहे. ‘मिर्झा मलिक शो’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. दोघेही या शोमध्ये एकत्र हजेरी लावणार असल्याचं कळतंय. उर्दूफ्लिक्स या पाकिस्तानी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा शो प्रसारित होणार आहे.

TRP साठी घटस्फोटाची चर्चा का?

या शो बद्दलची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी सानिया-शोएबला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शोचा TRP वाढवण्यासाठी जाणूनबुजून घटस्फोटाची बातमी पसरवण्यात आली, असा चाहत्यांचा आरोप आहे. सानिया मिर्झा सध्या पाकिस्तानात नाही. त्यामुळे हा शो आधीच शूट करण्यात आला, असाही आरोप केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

दोघांमध्ये दुरावा आल्याचा कशावरुन काढला अर्थ?

सानिया आणि शोएब काही शोज आणि ब्रँडसच्या करारातील कायदेशीर बाबींमुळे आपला घटस्फोट जाहीर करत नाहीयेत, असं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. सानिया आणि शोएब यांनी अजूनपर्यंत घटस्फोटाची बातमी नाकारलेली नाही किंवा त्याला दुजोराही दिलेला नाही. सानियाच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवरुन या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा अर्थ काढण्यात आला आहे.

दोघांमध्ये दुराव्याचं कारण काय?

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. त्यावेळी या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. सानियावर त्यावेळी भारतातून बरीच टीका करण्यात आली होती. मागच्या 12 वर्षांपासून या जोडप्याचा सुखाने संसार सुरु होता. 2018 मध्ये दोघं आई-बाबा झाले. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा ओमरचं नाव घेतलं जात आहे. शोएब मलिकबरोबर तिची जवळीक या दोघांच्या दुराव्याला कारण ठरल्याची चर्चा आहे. मागच्यावर्षी शोएब मलिक आणि आयशा ओमरने एका हॉट फोटोशूट केलं होतं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.