सानिया-शोएब तलाकनंतरही मुलाचं संगोपन करणार; घटस्फोट घेणाऱ्यांनो मुलांसाठी ‘या’ 10 गोष्टी करा
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटानंतर सर्वजण हैराण झाले आहेत. हेच नाही तर शोएब मलिक याने आता तिसरे लग्न देखील केले आहे. नुकताच सोशल मीडियावर शोएब मलिक याने काही फोटो हे शेअर केले. तिसऱ्या पत्नीसोबत अत्यंत रोमॅटिंक फोटो शेअर करताना शोएब मलिक हा दिसला.
मुंबई : सानिया मिर्झा हिच्या पतीने तिसरे लग्न करताच सर्वजण चांगलेच हैराण झाले. हेच नाही तर शोएब मलिक याने या लग्नाचे अत्यंत खास असे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री आयशा हिच्यासोबत निकाह केला. हे फोटो पाहून सानिया मिर्झा हिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसली. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा निकाह 2010 मध्ये हैद्राबाद येथे झाला.
सुरूवातीला काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी निकाह केला. सानिया मिर्झा हिच्या अगोदरही शोएब मलिक याचे एक लग्न झाले. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. गेल्याच वर्षी मुलाचा वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने दुबईला साजरा करताना सानिया आणि शोएब दिसले.
लग्नानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दुबईला शिफ्ट झाले. आता शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या मुलाचे संगोपन कोण करणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने याबद्दलची माहिती ही नुकताच शेअर केलीये.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या मुलाचे नाव इजहान आहे. माहितीनुसार आता घटस्फोटानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दोघेही मुलाचा सांभाळ करणार आहेत. दोघेही आपल्या जिमेदारी निभावणार आहेत. हेच नाही तर दोघांसोबतही इजहान हा राहणार असल्याचेही सांगितले जातंय. दोघांनीही याबद्दलच्या काही गोष्टी अगोदरच ठरवल्या आहेत.
घटस्फोट घेणाऱ्यांनी मुलांसाठी ‘या’ 10 गोष्टी करायला हव्यात. यामध्ये महत्वाचे म्हणजे तुमची मुले नेमकी कुठे राहणार हे अगोदरच ठरवा. तुमच्यासोबत की हाॅटेलवर. दोघांनीही आपल्या मुलांना कधी भेटायचे हे अगोदरच ठरवा. जर तुमच्या घटस्फोटानंतर तुमची मुले ही आजी आजोबाकडे राहणार असतील तर हे अगोदरच ठरवा की, कोण कोणती जबाबदारी घेणार.
मुलांच्या शिक्षणाचा खर्च कोण उचलणार हे देखील अगोदरच ठरवा. मुलांच्या शाळेमध्ये मिटिंगला कोण जाणार हे देखील अगोदरच ठरवा. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर मुलांचा ताण कसा कमी करता येईल याचाही विचार करा. जर मुलांना हाॅस्टेलला सोडणार असाल तर त्यांना भेटायला कधी कोण जाणार हे ठरवा. मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या नावे पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करा.