नवऱ्याचं दुसरं लग्न, प्रचंड मानसिक धक्का; सानिया मिर्झा पुढे आता पर्याय काय?
Sania Mirza and Shoaib Malik : सानिया मिर्झा ही सध्या तूफान चर्चेत आलीये. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, दोघांनीही यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करणे टाळले. आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आलीये, ज्यानंतर सर्वजण हैराण झाले.
मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा ही सध्या तूफान चर्चेत आलीये. सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत 2010 मध्ये लग्न केले. सानिया आणि शोएब यांचे लग्न हैद्राबाद येथे पार पडले. गेल्या काही दिवसांपासून सतत सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत दिसली. मात्र, यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर माैन बाळगले. हेच नाही तर एका आगामी शोच्या प्रमोशनसाठी हे सर्वकाही सुरू असल्याचे मध्यंतरी सांगितले गेले. मात्र, आता नुकताच एक हैराण करणारी पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये.
सानिया मिर्झा हिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने थेट दुसरे लग्न केले आहे. हेच नाही तर त्याने या लग्नातील काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे आता चाहते हे चांगलेच हैराण झाले आहेत. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केलाय. सना जावेद हिच्यासोबतचे काही खास फोटोही त्याने शेअर केले आहेत.
नवऱ्याच्या या निकाहामुळे सानिया मिर्झा हिला चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. सानिया मिर्झा हिने शोएबच्या लग्नानंतर आठ वर्षांनी एक मुलाला जन्म दिला. गेल्याच वर्षी मुलाचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा करताना शोएब आणि सानिया मिर्झा हे दिसले. सतत यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच आता थेट शोएब याने निकाहच केलाय.
नव्या पत्नीसोबतचे अत्यंत रोमॅंटिक फोटो शेअर करताना शोएब मलिका हा दिसला आहे. सानिया मिर्झा हिने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ज्यानंतर तलाक होणारच यावर चर्चा होती. आता शोएब मलिक याच्या निकाहनंतर सानिया मिर्झा देखील आयुष्यामध्ये पुढे जात परत एकदा लग्न करणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
सानिया मिर्झा हिने शेअर केलेल्या पोस्टनंतर असा अंदाजा लावला जातोय की, सानिया मिर्झा ही सध्याच लग्न करणार नाहीये. सानिया हिने आपल्या पोस्टमध्ये थेट शादी मुश्किल असल्याचे म्हटले आहे. तसेच तलाक देखील मुश्किल असल्याचे तिने म्हटले आहे. हे नक्कीच आहे की, सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आलंय. नवऱ्याच्या लग्नामुळे सानिया मिर्झा हिला चांगलाच मानसिक धक्का बसलाय.