AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्यासाठी माझा बाबा…’ सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लेक सारा भावूक

साराने वडील सचिन तेंडुलकरसोबतचे तिचे सुंदर नाते तिच्या शब्दांत व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने वडिलांच्या काही गोष्टी शेअर करत तिच्या बाबाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

'माझ्यासाठी माझा बाबा...' सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लेक सारा भावूक
Sara Tendulkar sends emotional birthday wishes to father Sachin Tendulkar Image Credit source: instagram
| Updated on: Apr 24, 2025 | 5:49 PM
Share

प्रत्येक मुलीचे आपल्या वडिलांसोबत एक खास नाते असते. त्यात मैत्रीही असते. मग ते बाप-लेक सामान्य असो किंवा सेलिब्रिटी. अशी एक बाप-लेकीची जोडी नेहमी चर्चेत असते ती म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सारा. सचिन तेंडुलकर आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या मित्रपरिवार, कुटुंबीय ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

वडिलांसोबतचे सुंदर नाते वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले

सारा तेंडुलकर तिच्या वडिलांवर किती प्रेम करते हे नेहमीच कोणत्या कोणत्या प्रसंगातून समोर येतच. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी त्याचं कौतुक करत साराने त्याच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत.  तिच्या वडिलांबद्दल बोलताना सारा भावनिक झाल्याचं लक्षात येत आहे. सारा तेंडुलकरने वडील सचिनसोबतचे तिचे सुंदर नाते तिच्या शब्दांत व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करतं तिने वडिलांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. आणि त्याच शब्दांतून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

वडील सचिनच्या नावाने साराची भावनिक पोस्ट

सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर वडील सचिनसोबतचे नवीन आणि जुने फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ” ज्या व्यक्तीने मला कोणाला न घाबरणे तर शिकवलं पण समोरच्यांचा आदर करायलाही शिकवले. असा व्यक्ती हाताला दुखापत झालेली असताना किंवा इतर अनेक दुखापती झालेल्या असतानाही मला कुशीत उचलून घ्यायचा, माझ्या फोटोशूटचा एक महत्त्वाचा भाग असलेली व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मजा करणे, हसणे आणि जीवनाचा आनंद घेणे किती महत्त्वाचे आहे हे मला शिकवणारी व्यक्ती. माझ्यासाठी तो माझा बाबा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा” असं म्हणत साराने सचिनसोबतच्या तिच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

साराने तिच्या वडिलांना मदत करायला सुरुवात केली आहे.

सारा तेंडुलकर आता सचिनला त्याच्या कामात मदतही करते. ती हे काम खूप चांगल्या प्रकारे करत असल्याचे दिसते. सारा तेंडुलकरने अलीकडेच तिच्या वडिलांच्या एनजीओ सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये संचालकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

सारापूर्वी अर्जुननेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

सारा तेंडुलकरसोबतच अर्जुन तेंडुलकरनेही वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानेही वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.