स्मृती मंधाना हे 2 गुण असलेल्या मुलाशीच करणार लग्न; अमिताभ बच्चन यांच्यासमोर खुलासा

'नॅशनल क्रश' मानली जाणारी भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मंधाना हिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. एखाद्या मुलामधील कोणते गुण स्मृती आवडतात, हे अनेकांना जाणून घ्यायचं असेल. त्याचं उत्तर तिने नुकतंच केबीसीमध्ये दिलं आहे.

स्मृती मंधाना हे 2 गुण असलेल्या मुलाशीच करणार लग्न; अमिताभ बच्चन यांच्यासमोर खुलासा
स्मृती मंधानाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 3:32 PM

मुंबई : 26 डिसेंबर 2023 | भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मंधानाला ‘नॅशनल क्रश’ म्हटलं जातं. इन्स्टाग्रामवर तिचे 85 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गेल्या काही काळापासून तिचं नाव संगीतकार पलाश मुच्छालशी जोडलं जात आहे. मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करणार, याचा खुलासा तिने नुकताच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ या शोमध्ये केला. केबीसीच्या ‘उपलब्धियों का वर्ष’ या खास एपिसोडमध्ये स्मृतीने हजेरी लावली होती. यावेळी शोमध्ये स्मृती मंधानासोबत भारतीय क्रिकेट टीमचा बॉलर इशान किशनसुद्धा उपस्थित होता.

शोदरम्यान प्रेक्षकांमधील एका तरुणाने स्मृतीला प्रश्न विचारला, “तुझे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. भारतातील बहुतांश तरुण मुलं तुला फॉलो करतात. तर मग मला असा प्रश्न विचारायचा आहे की, तुला एका मुलामधले कोणते गुण आवडतात?” हा प्रश्न ऐकताच सूत्रसंचालक बिग बी हसू लागतात आणि त्याला विचारतात, “तुझं लग्न झालं आहे का?” त्यावर तो तरुण म्हणतो, “नाही झालं, म्हणूनच हा प्रश्न विचारला आहे.”

हे सुद्धा वाचा

या प्रश्नाचं उत्तर देताना स्मृती मंधाना हसत बोलते, “मी अशा प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. होय, मुलगा चांगला असावा, ही सर्वांत महत्त्वपूर्ण बाब आहे.” यापुढे ती काही म्हणण्याआधीच अमिताभ बच्चन तिला पुढचा प्रश्न विचारतात, “चांगला असावा म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय?” बिग बींच्या प्रश्नाचं उत्तर देत स्मृती म्हणते, “माझ्या मते तो काळजी घेणारा आणि माझ्या खेळाला समजणारा असावा. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे दोन गुण त्या व्यक्तीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण एक मी त्या व्यक्तीला खूप सारा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्याने माझी ही गोष्ट समजणं आणि काळजी घेणं महत्त्वाचं आहे. माझ्या प्राधान्यक्रमात या दोन गोष्टी सर्वांत वर आहेत.”

स्मृती मंधानाचा जन्म मुंबई 18 जुलै 1996 रोजी झाला. तिने आतापर्यंत 6 टेस्ट, 80 वनडे आणि 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने अनुक्रमे 480, 3179 आणि 2998 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये तिची सरासरी 27.25 आणि स्ट्राइक रेट 122.46 इतकी आहे. तिने टेस्टमध्ये एक आणि वनडे सामन्यात आतापर्यंत पाच शतकं झळकावली आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.