Vinod Kambli: विनोद कांबळीने स्वीकारली कपिलदेवची ऑफर, त्या गोष्टीसाठी झाला तयार

Vinod Vambli and Kapil Dev: विनोद कांबळीने 2009 मध्ये सचिन तेंडुलकरसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याने शालेय मित्र असलेल्या सचिनवर मदत न करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमधील संवाद बंद झाल्याचे सांगितले जात आहे.

Vinod Kambli: विनोद कांबळीने स्वीकारली कपिलदेवची ऑफर, त्या गोष्टीसाठी झाला तयार
विनोद कांबळी, कपिल देव, सचिन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 7:37 AM

Vinod Vambli and Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा सध्या वाईट कारकिर्दीतून जात आहे. आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टिने तो अडचणीत आला आहे. त्याची ही परिस्थिती मुंबईत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून समोर आली. त्यानंतर 1983 मधील विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कपिल देव याने त्याच्यापुढे मदतीचा प्रस्ताव ठेवला. परंतु त्यासाठी त्याच्यापुढे एक अट टाकली. विनोद कांबळीने दारु सोडल्यास त्याला आर्थिक मदत करण्याची तयारी कपिल देव यांनी दर्शवली. कपिल देव यांची ही ऑफर विनोद कांबळी याने स्वीकारली आहे. आता आता 15 व्या व्यसनमुक्ती केंद्रात जाण्यास तयार झाला आहे.

कपिल देवची ऑफर स्वीकारली

52 वर्षीय विनोद कांबळी याने नुकतीच सोशल मीडियावर मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने कपिल देव यांची ऑफर आपण स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. तसेच कपिल देव यांनी दिलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. कांबळी म्हणाला, दारु सोडण्यासाठी मी रिहॅब (व्यसनमुक्ती केंद्र) केंद्रात जाण्यासाठी तयार आहे. माझा परिवार माझ्या सोबत आहे.

आर्थिक परिस्थिती संकटात

विनोद कांबळी यापूर्वी 14 वा वेळा रिहॅब केंद्रात जाऊन आला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. आता कपिल देव यांची ऑफर स्वीकारत तो 15 व्यांदा रिहॅब केंद्रात जात आहे. कांबळी याने सांगितले की, सध्या त्याला युरिन इंफेक्शनचा त्रास होत आहे. त्यामुळे मागील महिन्यात तो बेशुद्ध झाला होता. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. सध्या त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी त्याच्याकडे लक्ष ठेवत आहे. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 30 हजार रुपयांच्या पेन्शनवर त्याचे कुटुंब चालत आहे.

हे सुद्धा वाचा

विनोद कांबळीने 2009 मध्ये सचिन तेंडुलकरसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याने शालेय मित्र असलेल्या सचिनवर मदत न करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमधील संवाद बंद झाल्याचे सांगितले जात आहे. 2013 मध्ये सचिनने निवृत्ती घेतली. त्यात निरोप समारंभाच्या भाषणात सचिनने विनोद कांबळीचा उल्लेख केला नव्हता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.