WTC फायनल सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार? अजित आगरकरने सांगितलं नाव!

भारताकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक रन्स कोण करणार? या प्रश्नाचं उत्तर देताना अजित आगरकरने खास नाव सांगितलं. (Virat kohli Will Maximum Runs in WTC Final Says Ajit Agarkar World test Championship 2021)

WTC फायनल सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार? अजित आगरकरने सांगितलं नाव!
विराट कोहली आणि अजित आगरकर
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 8:36 AM

मुंबई :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. आयसीसी कसोटी रॅंकिगमध्ये (ICC Test Ranking) अव्वल स्थानावर असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघानी कंबर कसली आहे. या सामन्याला आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कमी दिवस राहिलेत. सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. अशातच भारतात माजी कसोटीपटू अजित आगरकरने (Ajit Agarkar) मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक रन्स कोण करणार? या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने खास नाव सांगितलं आहे. (Virat kohli Will Maximum Runs in WTC Final Says Ajit Agarkar World test Championship 2021)

सर्वाधिक रन्स कोण करणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार, कुणाची बॅट तळपणार, कोण कुणाचं उट्टं काढणार, याच्या खमंग चर्चा सध्या रंगतायत. यातच माजी कसोटीपटू अजित आगरकरला जेव्हा अंतिम सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीचं नाव सांगितलं.

सामना कोण जिंकणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान होत असलेल्या अंतिम सामन्यात कोण कुणाला आस्मान दाखवणार, याच्याही चर्चा तितक्याच जोरदारपणे रंगताना दिसून येत आहेत. दिग्गज खेळाडू दोन्ही संघांना पसंती देत आहेत. आगरकरनेही काहीसा अंदाज वर्तवला आहे. सामना कोण जिंकू शकतो, हे आताच सांगणं मुश्किल आहे. कारण दोन्हीही संघ तितकेच ताकदीचे आणि तुल्यबळ आहेत, असं आगरकर म्हणाला.

पुजारा आणि शमी न्यूझीलंडवर भारी, पार्थिवचा अंदाज

दरम्यान या सामन्यात भारताचे दोन खेळाडू न्यूझीलंडवर भारी पडू शकतात, अशी भविष्यवाणी माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने (Parthiv Patel) केली आहे. हे खेळाडू म्हणजे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाज मोहम्मद शमी…!

सामना टाय झाल्यास किंवा अनिर्णित झाल्यास विजेता कोण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळला जाईल. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघ संयुक्तरित्या विजेते ठरतील.

या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे. सामन्यादरम्यान विविध कारणांमुळे व्यत्यय येतो. त्यामुळे काही वेळ खेळ होत नाही. कधी पावसामुळे तसेच विविध कारणांमुळे काही वेळ सामना थांबवावा लागतो. साधारणपणे एक कसोटी खेळवण्यासाठी 30 तासांचा खेळ अपेक्षित असतो. तर हाच वेळ दिवसाकाठी 6 तास इतका असतो. या 6 तासांमध्ये चहापान, लंच आणि ड्रिंक्स ब्रेकचा समावेश नसतो.

(Virat kohli Will Maximum Runs in WTC Final Says Ajit Agarkar World test Championship 2021)

हे ही वाचा :

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

Non Stop LIVE Update
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.